शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे वजन वाढल्याने मागितला घटस्फोट!

By admin | Updated: June 23, 2014 12:41 IST

पत्नीच्या वाढत्या वजनाचे कारण देत पतीने घटस्फोटासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र, घटस्फोटासाठी वजन वाढीचे कारण अयोग्य असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने पतीची याचिका फेटाळली आहे.

 याचिका फेटाळली : मुंबई उच्च न्यायालयातील प्रकरण

मुंबई : पत्नीच्या वाढत्या वजनाचे कारण देत पतीने घटस्फोटासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र, घटस्फोटासाठी वजन वाढीचे कारण अयोग्य असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने पतीची याचिका फेटाळली आहे. पुणे कौटुंबिक न्यायालयाने पतीची याचिका फेटाळल्यानंतर त्यांने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.पत्नीच्या वाढत्या वजनाचा परिणाम आपल्या वैवाहिक जीवनावर होत असल्याचे कारण पतीने याचिकेत दिले आहे. पतीने याचिकेत केलेल्या दाव्यानुसार, लग्नाआधी केलेल्या शस्त्रक्रियेबाबत मुलीच्या कुटुंबियांनी आपल्याला कोणतीही माहिती दिली नव्हती. मात्र लग्नानंतर पत्नीचे वजन झपाट्याने वाढू लागल्यावर सत्य समजले. वजन कमी करण्यासाठी वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला. मात्र, तो ही सल्ला पत्नीने नाकारला. घरातील दैनंदिन कामासही ती टाळाटाळ करते. यामुळे वैवाहिक जीवनाचा आनंद घेता येत नसल्याचे पतीने याचिकेत म्हटले आहे.सोलापूर येथील एका विवाह मंडळात या पती-पत्नीची भेट झाली होती. त्यावेळी पत्नीने आपल्या शस्त्रिक्रियेबाबत कोणतीही कल्पना दिली नसल्याचे पतीचे म्हणणे आहे. मात्र विवाह मंडळाच्या अर्जात शस्त्रक्रियेबाबत माहितीचा कोणताही रकाना नसल्याने माहिती लिहीली नसल्याचे पत्नीने सांगितले आहे. शिवाय लग्नाआधी नवर्‍याने कोणत्याही मोठय़ा शस्त्रक्रियेबाबत विचारणा केली नसल्याचा खुलासा पत्नीने केला आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर, वाढते वजन घटस्फोटासाठी ठोस कारण नसल्याचे सांगत न्यायाधीश एम.एस.सोनक आणि ए.एस.ओक यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळली आहे. (प्रतिनिधी)