शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समित्या

By admin | Updated: September 4, 2015 23:08 IST

जिल्हास्तरीय समितीची धुरा जिल्हाधिका-यांची हाती सोपविण्यात येणार.

वाशिम : 'कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र' हे ध्येय समोर ठेवून राज्य शासनाने कौशल्य विकास कार्यक्रमाची आखणी केली आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यभरात जिल्हास्तरीय समित्यांचे गठण केले जाणार आहे. जिल्हास्तरीय समितीची धुरा जिल्हाधिकार्‍यांची हाती सोपविण्यात येणार असून, रोजगार व स्वयंरोजगार जिल्हा कार्यालयाचे सहायक संचालक हे सचिव म्हणून राहणार आहेत. जिल्हास्तरीय समितीबाबत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने २ सप्टेंबर रोजी आदेश जारी केले आहेत.राज्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करणे आणि अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व अन्य क्षेत्रात रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची सुरुवात राज्यात २0१0 पासून झाली आहे. २0१५ मध्ये या कार्यक्रमाला व्यापक स्वरुप देण्यात येत आहे. केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात ह्यमेक इन महाराष्ट्रह्ण या ध्येयास अनुसूरुन कौशल्य विकास अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभाग या स्वतंत्र विभागाची स्थापना जानेवारी २0१५ मध्ये करण्यात आली. कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्याबरोबरच बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी या विभागावर सोपविण्यात आली आहे. कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीचा एक भाग म्हणून आता जिल्हास्तरावर समित्या गठीत केल्या जाणार आहेत. या समित्यांमध्ये विविध मंत्रालयीन विभागाच्या क्षेत्रीय अधिकार्‍यांचा समावेश राहणार आहे. जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली राहणार असून, सचिव म्हणून रोजगार व स्वयंरोजगार जिल्हा कार्यालयाचे सहायक संचालक कामकाज पाहणार आहेत. या समितीत जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे.