शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

७ वर्षांत गुन्ह्यात दोषी ठरलेली व्यक्ती चालक म्हणून अपात्र

By admin | Updated: October 9, 2015 01:29 IST

काळी पिवळी टॅक्सी, फ्लिट टॅक्सी, तसेच अ‍ॅग्रीगेटर्सकडून चालवल्या जाणाऱ्या टॅक्सीसेवा एक समान पातळीवर आणण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने सिटी टॅक्सी योजना २0१५

मुंबई : काळी पिवळी टॅक्सी, फ्लिट टॅक्सी, तसेच अ‍ॅग्रीगेटर्सकडून चालवल्या जाणाऱ्या टॅक्सीसेवा एक समान पातळीवर आणण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने सिटी टॅक्सी योजना २0१५ आणून त्याची अधिसूचना जारी केली. या योजनेत खासगी टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एका नव्या नियमाची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार गेल्या सात वर्षांत एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरलेली व्यक्ती टॅक्सी चालक म्हणून अपात्र ठरणार आहे. टॅक्सी कंपनीकडूनही अशा व्यक्तीला चालक म्हणून नेमता येणार नसल्याचे परिवहन विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. नवी दिल्लीत उबेर टॅक्सी चालकाकडून एका युवतीवर बलात्कार केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. राज्यातही खासगी टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला आणि खासगी टॅक्सी कंपन्यांसाठी एक नियमावली तयार करण्याचा निर्णय झाला, पण अशी नियमावली बनवण्यासाठी राज्य सरकारकडे अधिकार नसल्याचे सांगत केंद्र सरकारकडूनच यावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सुरुवातीला परिवहन विभागाकडून देण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारकडेही नियमावली तयार करण्याचा अधिकार असल्याचे सांगत, काळी-पिवळीसह खासगी टॅक्सी कंपन्यांसाठी नवी सिटी टॅक्सी योजना तयार करुन अधिसूचना जारी करण्यात आली. अंमली पदार्थ किंवा दारु पिऊन वाहन चालवणे, लैंगिंक गुन्हा, फसवणूक, चोरी, संपत्तीवरुन वादविवादात मारहाण इ. गुन्ह्यांचा समावेश असून, त्यात दोषी आढळल्यास चालक अपात्र ठरणार असल्याचे सांगण्यात आले.३१ आॅक्टोबरपर्यंत मागविल्या हरकती व सूचनाखासगी टॅक्सी कंपनीत चालक म्हणून ठेवताना पोलिसांकडूनही त्याची सर्व माहिती खातरजमा करुन घेणे गरजेचे असल्याचे योजनेत नमूद आहे. सध्या काळ्या-पिवळ््या टॅक्सीचे लायसन्स देताना त्याने पूर्वचारित्र प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. हे प्रमाणपत्र पोलिसांकडूनच देण्यात येते, परंतु खासगी टॅक्सी कंपन्यांसाठी अशा प्रकारची नियमावली नव्हती.या योजनेतील तरतुदींवर टॅक्सी संघटनांसह नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. त्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे.