शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टल सवलतीतून अपंगांना वगळले

By admin | Updated: December 20, 2014 03:16 IST

पोस्टल विभागाने घेतलेल्या विविध पदांच्या भरतीत दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत पीएच १, २, ३ गटातील अपंग उमेदवारांना सवलतीमधून वगळण्यात आले

मुंबई : पोस्टल विभागाने घेतलेल्या विविध पदांच्या भरतीत दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत पीएच १, २, ३ गटातील अपंग उमेदवारांना सवलतीमधून वगळण्यात आले आहे. इतर प्रवर्गांना सवलत दिली जात असताना अपंग उमेदवारांवर अन्याय होत असल्याने उमेदवारांनी विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोस्टल विभागाच्या वतीने ११ मे रोजी विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. पहिल्या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची महाराष्ट्र सर्कलसाठी ८ ते १३ नोव्हेंबर दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत टाईपिंग करू शकत नसलेल्या उमेदवारांना सवलत देण्यात आली. मात्र जे टायपिंग करू शकतात, त्या अपंग पीएच १, २, ३ गटातील उमेदवारांना कोणतीही सवलत देण्यात आली नसल्याने उमेदवारांनी विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. पेपर दोनच्या पात्रतेसाठी ओबीसींना ३७ टक्के, एससी/एसटींना ३३ टक्क्यांची सवलत असताना अपंगांना खुल्या प्रवर्गाप्रमाणे ४० टक्के गुण मिळवावे लागणार आहेत. यामुळे अपंग उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या इतर विभागाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये अपंगांना गुणांमध्ये सवलत दिली जाते. मात्र, या परीक्षेत अपंगांना सवलत नाकारण्यात आल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात पोस्टल विभागाकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही. (प्रतिनिधी)