शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

राज्यात ५० लाख नागरिकांना डिजिटल उतारे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:59 PM

राज्य सरकारकडून नागरिकांना अधिकाधिक सुविधा ऑनलाइन पध्दतीने देण्याची भूमिका आहे..

ठळक मुद्देपुणे महसुली विभागात सर्वाधिक वाटप : तर मुंबई उपनगरात ४७६५ सर्वात कमीदैनंदिन उतारे वाटपाची संख्या ही राज्यातील उर्वरित जिल्ह्यांपेक्षा सर्वाधिक

पुणे : राज्य सरकारकडून नागरिकांना अधिकाधिक सुविधा ऑनलाइन पध्दतीने देण्याची भूमिका आहे. त्यादृष्टीने भूमि अभिलेख विभागाकडून सातबारे, ८ अ आणि ई फेरफार आदी प्रकारचे दस्ताऐवज ऑनलाइन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील ५० लाख ६६ हजार १९७ नागरिकांना डिजिटल सातबारे, ८ अ आणि ई फेरफार देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे ई फेरफार प्रकल्प समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली. राज्यातील पुणे महसूल विभागातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात सर्वाधिक सातबारे, ८ अ आणि ई फेरफार वाटप करण्यात आली आहे. याठिकाणी प्रशासकीय यंत्रणेने राबविलेल्या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तसेच दैनंदिन उतारे वाटपाची संख्या ही राज्यातील उर्वरित जिल्ह्यांपेक्षा सर्वाधिक असल्याचे रामदास जगताप यांनी सांगितले.

राज्यातील प्रमुख जिल्ह्यानिहाय डिजिटल वाटप केलेले उतारेकोल्हापूर ४६४२३३, सांगली ४२७९१७, पुणे ४०७६११, बुलढाणा ३०७९८४, जळगाव ३०२८३७, सातारा २९२९२१, अहमदनगर २८५८३८, नाशिक २,४२,८५९, सोलापूर २,१८,४७६, यवतमाळ १,८६,२६४, रायगड १,८४,४८६, चंद्रपूर १,५७,४६०, बीड १,४७,२६२, नांदेड १,२७,९९२, धुळे १,१८,७८०, ठाणे १,१६,३८८, नागपूर १,१०,०५५, वर्धा १,०५५३१, भंडारा ९९,१५०, रत्नागिरी ८१,३१०, अकोला ७८,६१९, गोंदिया ७४,६९४, लातूर ७३,९१९, गडचिरोली ७१,७०४, अमरावती ७०,८३५, जालना ६९,६०२, परभणी ६१,७८०, पालघर ५४,२१२, हिंगोली ३३,२४४, उस्मानाबाद ३०,१०१, औरंगाबाद २१,९०४, वाशिम १८,१६६, नंदूरबार १७,२८८ आणि मुंबई उपनगर ४७६५ असे एकूण ५० लाख ६६ हजार १९७ सातबारे, ८ अ आणि ई फेरफार वाटप करण्यात आल्याचे रामदास जगताप यांनी सांगितले..........डिजिटल सातबारा उताऱ्यामुळे हे होणार फायदे * सातबारा उतारे मिळण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागणार नाही. * डिजिटल सातबारा कायदेशीर असणार आहेत.* हव्या त्या वेळी नागरिकांना सातबारा मिळणार आहे.

टॅग्स :PuneपुणेdigitalडिजिटलGovernmentसरकारFarmerशेतकरी