शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

धर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 3:31 PM

शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी गेल्या गेल्या वर्षी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात थेट मंत्रालयातच आत्महत्येचे पाऊल उचलणाऱ्या धर्मा पाटील यांच्या मुलाने आज मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. महत्वाचे म्हणजे आज मुंबईतच मनसेचे महाअधिवेशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी गेल्या गेल्या वर्षी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचे उपचारावेळी निधन झाले. यामुळे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठली होती. 

धर्मा पाटील यांच्या पाच एकर जमिनीच्या मोबदल्यात केवळ चार लाखाचा मोबदला औष्णिक वीज प्रकल्पासाठी वीज निर्मिती करणाऱ्या यंत्रणेने देऊ केला. मात्र हा मोबदला योग्य नसल्यानं वीज प्रकल्पासाठी जमीन संपादित करणा-या यंत्रणेकडून दुजाभाव झाल्याचा आरोप करीत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील ८० वर्षीय धर्मा पाटील यांनी गेल्या सोमवारी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. धर्मा पाटील यांच्या चार एकर शेतात ६००आंब्याची झाड लागवड केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. शेतात विहीरदेखील आहे. या प्रकल्पासाठी ५२९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आलीय.धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला. तर दुसऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आला आहे. योग्य मोबदल्यासाठी धर्मा पाटील गेल्या तीन महिन्यांपासून मंत्रालयाचे उंबरे झिजवत आहेत. मात्र त्यांना कुणीही प्रतिसाद देत नसल्याने हतबलतेतून त्यांनी अखेर स्वतःला संपवण्याच प्रयत्न केला. 

यानंतर नरेंद्र पाटील यांनाही फडणवीस सरकारने या ना त्या मार्गाने त्रास दिला होता. त्यांना लेखी आश्वासन देऊनही पूर्ण करण्यात आले नव्हते. नरेंद्र पाटलांना आणि त्यांच्या आईला फडणवीसांच्या धुळे दौऱ्यावेळी घरातच डांबण्यात आले होते. याविरोधात राष्ट्रवादीने आवाजही उठविण्याचा प्रयत्न केला होता. अखेर महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नरेंद्र पाटील यांना शपथविधीला बोलावण्यात आले होते. नरेंद्र पाटील विधानसभा निवडणुकीवेळी मनसेमध्ये प्रवेश केला होता. विधानसभेला तिकीटही मिळाले होते. मात्र, यावेळी त्यांचा पराभव झाला होता. आज ते राष्ट्रवादीत गेले आहेत.

टॅग्स :Dharma Patilधर्मा पाटीलMNSमनसेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाSharad Pawarशरद पवार