शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा ‘चक्काजाम’

By admin | Updated: August 15, 2014 02:55 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी गुरूवारी झालेल्या चक्काजाम आंदोलनाला बारामतीमध्ये हिंसक वळण

मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी गुरूवारी झालेल्या चक्काजाम आंदोलनाला बारामतीमध्ये हिंसक वळण लागले़ आंदोलकांनी दुकानांवर व ११ एसटी बसेसवर दगडफेक केली़ सायंकाळनंतर परिस्थिती निवळली असली तरी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे़ हिंगोलीच्या वसमतमध्येआणि सातारा जिल्ह्यात फलटणमध्येएस. टी. बसेस फोडण्यात आल्या.दगडफेकीत तिघेजण जखमी झाले. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर आंदोलकांनी अबीर (बुक्का) ओतल्याने तणाव निर्माण झाला होता. अबीर ओतणाऱ्या मारुती जानकर यांना शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले़ याला राष्ट्रीय समाजपक्षाने पाठिंबा दिला होता. बारामतीमध्ये या पक्षाचे कार्यकर्ते मेंंढ्यांसह आंदोलनात उतरले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यासमोर निदर्शने करण्यात आली़ धनगर समाज आरक्षण कृती समितीने नागपूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात रस्ता रोको केला़ यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी अनेकांना स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका केली. हिंगोलीत महामार्गावर सुमारे अर्धा तास पाठलाग करुन पोलिसांनी आंदोलकांना हुसकावून लावले. (लोकमत न्यूज नेटवर्क)