सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाच्या निर्मितीचा विचार सुरू, धनंजय मुंडे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 19:44 IST2020-08-28T19:42:59+5:302020-08-28T19:44:58+5:30
सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्ती देण्यासंदर्भात प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. नियुक्तीसाठी शैक्षणिक अर्हता तपासली जाईल. सफाई कामगारांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार आहोत, असेही मुंडे म्हणाले.

सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाच्या निर्मितीचा विचार सुरू, धनंजय मुंडे यांची माहिती
मुंबई - सफाई कामगारांचे विविध प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आयोजित एका बैठकीत मुंडे बोलत होते.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे , समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, सफाई कामगार संघटनेचे गोविंदभाई परमार, तसेच विविध सफाई कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुंडे म्हणाले, सफाई कामगारांच्या बाबतचा लाड-पागे समितीचा अहवाल व सद्यस्थिती यांचा समन्वय साधून योग्य निर्णय घेतला जाईल. कामगारांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील. सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्ती देण्यासंदर्भात प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. नियुक्तीसाठी शैक्षणिक अर्हता तपासली जाईल. सफाई कामगारांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार आहोत, असेही मुंडे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या -
घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार
कर्नाटकात पुन्हा वाद पेटला, रात्रीतूनच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्नांचा पुतळा
मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण
मोदी सरकारनं लॉन्च केली 'भूमी बँक', आता गुंतवणूकदारांना घरबसल्या मिळणार 'हे' मोठे फायदे
खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण
CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्ट नसल्याचा दावा