Dhanajay Munde: 'मुंडें साहेबांच्या वारसांना हे जमलं नाही'; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना अप्रत्यक्ष टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 21:43 IST2022-04-03T21:21:48+5:302022-04-03T21:43:02+5:30
Dhanajay Munde: आज पुण्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्धाघटन करण्यात आले.

Dhanajay Munde: 'मुंडें साहेबांच्या वारसांना हे जमलं नाही'; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना अप्रत्यक्ष टोला
पुणे: आज पुण्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्धाघटन करण्यात आले. पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसरात हा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लावली. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी नाव न घेता पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना टोला लगावला.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
धनंजय मुंडे यांनी या मेळाव्यात पंकजा मुंडे यांचे नाव न घेता टीका केली. 'गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळ सुरू होत आहे. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी संघर्ष केला. त्यांच्या वारसदारांनाही संधी मिळाली, पण त्यांना हे महामंडळ निर्माण करता आले नाही', असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.
#थेटप्रक्षेपण
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 3, 2022
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचा लोकार्पण सोहळा
https://t.co/OoELaNXR6e
'अजित पवारांमुळे आजचा दिवस शक्य'
ते पुढे म्हणाले की, 'आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे. हा दिवस अजित पवार यांच्या शिवाय शक्यच नव्हता. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी लढा दिला. त्यांच्या कार्यकालात त्यांना हे महामंडळ देणे शक्य झाले नाही. कदाचित हे महामंडळ माझ्या आणि अजित पवार यांच्या हस्ते व्हावं, ही नियतीची इच्छा असावी. आजचा कार्यक्रम हा मुंडे साहेबांनी ही आदरांजली आहे', असंही धनंजय मुंडे म्हणाले.
'...काय तोंड घेऊन आम्ही मंत्रिपदी बसलोय'
ते पुढे म्हणाले की, आज असंख्य ऊसतोड भगिनींचा प्रश्न आहे. चार दिवस कमी होतात म्हणून आमच्या भगिनींचे गर्भायश काढावे लागत असेल तर काय तोंड घेऊन आम्ही मंत्रिपदी बसलोय. आमच्या भगिनींच्या आरोग्याची काळजीही हे महामंडळ घेईल. भगवान गड असेल किंवा बीड जिल्ह्यातील इतर गड असतील हे कोणत्याही मोठ्या माणसांच्या देणगीवर नाही तर ऊसतोड मजुरांच्या देणगीवर मोठे होतायेत, असंही धनंजय मुंडे म्हणाले.