शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
4
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
5
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
6
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
7
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
8
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
9
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
10
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
11
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
12
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
13
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
14
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
15
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
16
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
17
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
18
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
19
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
20
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले

देवेंद्र फडणवीसांची ड्रीम योजना पुन्हा सुरू होणार; जलयुक्त शिवार-२ सुरू करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 06:16 IST

जलयुक्त शिवार अभियान टप्पा-२ मध्ये प्रथम टप्प्यातील पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या पात्र गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे घेण्यात येतील.  

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेले आणि नंतर महाविकास आघाडी सरकारने बंद केलेले जलयुक्त शिवार अभियान नव्याने सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. 

यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान २०१५ ते २०१९ या कालावधीत राबविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने या अभियानात भ्रष्टाचार झाल्याचे, तसेच त्याचा फायदा झाला नसल्याचे सांगत,  बंद करण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर हे अभियान पुन्हा सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, मंत्रिमंडळाने जलयुक्त शिवार-२ अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

जलयुक्त शिवार अभियान टप्पा-२ मध्ये प्रथम टप्प्यातील पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या पात्र गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे घेण्यात येतील.  त्याचप्रमाणे, ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाचा पहिला टप्पा राबविला गेला आहे, पण अद्याप गावांमध्ये पाण्याची गरज आहे, तेथेही ही कामे लोकसहभागातून करण्यात येणार आहेत. 

५ हजार गावे सामील होणार या अभियानात येत्या ३ वर्षांत सुमारे ५ हजार गावे समाविष्ट केली जाणार आहेत. जलयुक्त शिवार अभियान २२ हजार ५९३ गावांत राबविण्यात आले व यामध्ये ६ लाख ३२ हजार ८९६ कामे पूर्ण झाली, तसेच २० हजार ५४४ गावे जल परिपूर्ण झाली. या कामांमुळे २७ लाख टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली, तसेच कृषीचे विशेषत: रब्बीतील उत्पादनही वाढले, असा दावा सरकारने केला आहे. संनियंत्रणासाठी समित्या  संनियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच तालुका स्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या असतील. कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी ३ लाखांपेक्षा अधिकचे काम ई-निविदेमार्फत करण्यात येईल. सर्व कामाचे मॅपिंग करून, नकाशे अद्ययावत करून जिओ पोर्टलवर टाकण्यात येतील.

हे असतील निकष nया अभियानासाठी जलयुक्त शिवार अभियान पहिला टप्पा, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व आदर्श गाव, तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकासाची कामे पूर्ण झालेली गावे वगळता उर्वरित गावे निवडण्यात येतील.  nगाव आराखडा तयार करताना पाणलोट क्षेत्र हा नियोजनाचा घटक राहील.  अंतिम आराखड्याला ग्रामसभेची मान्यता झाल्यानंतर, तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. nगाव आराखड्यानुसार कामे झाल्यानंतर गावाचा जल परिपूर्णता अहवाल तयार करण्यात येईल. पूर्ण झालेल्या योजनांसाठी देखभाल दुरुस्ती परिरक्षणही करण्यात येईल. nगावांमधील ग्रामस्थांची जलसाक्षरता अभियानाद्धारे जनजागृतीही करण्यात येईल. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस