शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा विकास आराखडा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 21:45 IST

विकास आराखड्याच्या आढावा समितीवर सदस्य नेमण्यावरुन पेचात पडलेल्या शिवसेनेने अखेर राजकीय खेळी करीत आपला बचाव केला़

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २३ : विकास आराखड्याच्या आढावा समितीवर सदस्य नेमण्यावरुन पेचात पडलेल्या शिवसेनेने अखेर राजकीय खेळी करीत आपला बचाव केला़ विरोधी पक्ष की मित्रपक्ष या अडचणीतून सुटका करुन घेण्यासाठी सर्वच गटनेत्यांना संधी देण्याची सुचना शिवसेनेने मांडली़ यास काँग्रेस वगळता सर्वच पक्षांनी समर्थन केले़ त्यानुसार हा प्रस्ताव फेरविचारार्थ पाठविण्यात आल्याने शहराचा नियोजन आराखडा महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे़

सन २०१४ ते २०३४ या २० वर्षांसाठी मुंबईचे नियोजन करणारा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे़ यावर तब्बल १३ हजार हरकती व सुचना नागरिकांनी पाठविल्या आहेत़ या सुचनांवर सुनावणीसाठी सात सदस्य समिती नेमण्यात येणार आहे़ यापैकी चार राज्य शासनाचे अधिकारी असून तीन सदस्य पालिकेच्या स्थायी समितीवरील असणार आहेत़ दोन सदस्य सत्ताधाऱ्यांचे ठरलेले असल्याने तिसरा कोण असा पेच शिवसेनेला पडला होता़

यावर आज पालिकेच्या महासभेत घोषणा करणे भाग असल्याने सर्वच गटनेत्यांची नियुक्ती या समितीवर करण्याची उपसुचना सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी मांडला़ दोन तास रंगलेल्या या चर्चेत २५ हून अधिक नगरसेवकांनी भाग घेतला़ यास विरोध दर्शवित विकास आराखडा लांबणीवर टाकण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केला़ मात्र शिवसेना भाजपाने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव फेरविचारार्थ पाठविला़ प्रतिनिधीविकास आराखड्याचा वाद कायमविकास नियोजन आराखड्यातील काही तरतुदींवरुन वाद निर्माण झाला होता़ अखेर मुख्यमंत्र्यांनी तो आराखडा रद्द करुन सुधारित आराखडा तयार करण्याचे आदेश दिले़ त्यानुसार सुधारित मसुद्याच्या हरकती व सुचनांवर सुनावणी होणार आहे़ नवीन वाद टाळण्यासाठी ही आढावा समिती नेमण्यात येणार होती़ या समितीमार्फत नागरिकांच्या तक्रारींवर अभ्यास होऊन तोडगा काढण्यात येणार होता़ मात्र सदस्य नियुक्तीवरुन आता नव्याला वादाला तोंड फुटल्याने गेले दोन वर्षे रखडलेला हा आराखडा आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे़शिवसेनेने असा केला बचावझोपडपट्ट्यांचे आरक्षण टाकलेले आहेत़ त्याचा विकास कसा करणार, त्याचा अंतर्भाव विकास आराखड्यात नाही़ अशा अनेक विषयांना नियोजन समितीला सामोरे जावे लागणार आहे़ १९९२ आणि २०१६ या सालामध्ये वाढलेल्या लोकसंख्येची मोठी तफावत आहे़ परिणामी विकास आराखड्याचा व्यापही वाढला आहे़ त्यामुळे सर्वपक्षीय सदस्यांचा या नियोजन समितीत सहभाग असावा, अशी भूमिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी मांडली़