Destroy enemy outposts by penetrating the Indian army | भारतीय रणगाड्यांच्या भेदक मार्‍याने शत्रूच्या चौक्या उध्वस्त; अंगावर शहारे आणणारा थरार
भारतीय रणगाड्यांच्या भेदक मार्‍याने शत्रूच्या चौक्या उध्वस्त; अंगावर शहारे आणणारा थरार

ठळक मुद्देके.के रेंजवर ऑपरेशन 'कवच प्रहार' या युद्ध प्रत्यक्षिकाचे आयोजनरेजिमेंटची चपळता, गतिशीलता आणि भेदक रणगाड्यांची मारक क्षमता अवाढव्य रणगाडे, कानठळ्या बसवणाऱ्या तोफांचा मारा, गोळीबार असा हा युद्धभूमीवरचा सारा थरार तब्बल तीन तास चाललेल्या या युद्ध सरावाची तीन भागात विभागणी

निनाद देशमुख - 

अहमदनगर: आकाशातुन वाऱ्याच्या वेगाने येत बॉम्ब टाकणारे हेलिकॉप्टर,  शत्रूवर कानठळ्या बसवणाऱ्या तोफद्वारे  भेदक मारा करत त्यांचा अचूक वेध घेणारे भारतीय रणगाडे, चारही बाजूने होणाऱ्या गोळीबार...अश्या परिस्थितीत योग्य नियोजन आणि उर भरविणाऱ्या जोशाने भारतीय सैन्याने शत्रूच्या चौक्यावर ताबा मिळवत तिरंगा फडकवला.... अंगावर काटा आणणारा हा थरार सोमवारी अनेकांनी अहमदनगर येथील के.के. रेंज येथे प्रत्यक्ष अनुभवला.

 भारतीय लष्कराच्या अहमदनगर येथील आर्मड कोअर सेंटर व स्कूल, मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर तर्फे सोमवारी के.के रेंजवर ऑपरेशन 'कवच प्रहार' या युद्ध प्रत्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रत्यक्षिकात लष्कराच्या टँक रेजिमेंटची चपळता, गतिशीलता आणि भेदक रणगाड्यांची मारक क्षमता उपस्थितांनी अनुभवली.  यावेळी आर्मड कोर अँड स्कुल अँड मॅकेईनाइज्ड इंफंटरी रेजिमेंटल सेंटरचे प्रमुख मेजर जनरल एस झा आणि मित्र राष्ट्रांच्या लष्कराचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
भारतीय लष्कराचे रणगाडे त्यांची मारक क्षमता आणि वेगवान हालचाली करण्याची क्षमता दाखवणासाठी तसेच डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज आणि टेक्निकल स्टाफ ऑफिसर कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी या युद्ध प्रत्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. 
  तब्बल तीन तास चाललेल्या या युद्ध सरावाची तीन भागात विभागणी करण्यात आली होती. पहिल्या भागात रणगाडे, बीएमपी वाहने आणि अटॅक हेलीकॉप्टर यांचे यांत्रिक कोशल्याची माहिती देण्यात आली. तर दुसऱ्या भागात लष्कराकडे असलेक्या विविध रणगाडे आणि चिलखती वाहनांची माहिती देण्यात आली.  
तिसऱ्या आणि महत्वाच्या भागात युद्ध भूमीत रंगाड्याच्या साहाय्याने युद्धभूमीत वेगवान हालचाली करून शत्रूवर विजय कसा मिळवतात हे दाखवण्यात आले. यावेळी लष्काराचे टेहळणी हेलिकॉप्टर, धुरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करुन जाणारे अवाढव्य रणगाडे, कानठळ्या बसवणाऱ्या तोफांचा मारा, गोळीबार असा हा युद्ध भूमीवरचा सारा थरार के. के. रेंज येथे  प्रात्यक्षिकांमध्ये पाहायला मिळाला. अंगावर शहारे आणणारा युद्ध भूमीचा रोमांच पाहून या सारवास उपस्तीत असलेल्या भारताच्या मित्र राष्ट्राचे सैन्य आणि सर्व निमंत्रित थक्क झाले. 
भारतीय लष्करा चे शा न असलेले अर्जुन, भीष्म, अजय, टी-९०, टी-७२, बीएमपी-२ या  रणगाड्यानी लक्ष्यावर मारा करत उद्धभूमितील आपली क्षमता या वेळी सिद्ध केली.  

‌यावेळी मेजर जनरल एस झा म्हणाले, आजच्या युद्धाचे स्वरूप बदलले आहे. युद्धामध्ये अधिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. रंगाड्याच्या युद्ध पद्धती भविष्यात टिकेल की नाही यावर प्रश्न उपस्तीत केले जात आहे. मात्र, शत्रू राष्ट्रात सुरक्षित करण्यासाठी रणगाडे रणगाडे आणि चिखली वाहने महत्त्वाची आहे त्यामुळे शत्रूवर वेगाने प्रहार करून त्याला ल हरवता येऊ शकते. त्यामुळे भविष्यातही रणगाड्यांचे महत्व  कायम राहील.


अर्जुन, भीष्म, अजय, टी-९०, टी-७२, बीएमपी-२ या अत्याधुनिक तंत्रप्रणाली असणारे रणगाडे सर्वांचे आकर्षण ठरले. अर्जुन, भीष्म, अजय, टी-९० या संगणकप्रणालीने युक्त असणा-या रणगाड्यांमध्ये अतिउच्च धूर निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे धोक्याच्या परिस्थितीत शत्रूला हुलकावणी देऊन पुन्हा तीव्र हल्ला चढविण्याचे सामर्थ्य या रणगाड्यांमध्ये आहे. या रणगाड्यांमध्ये रात्रीची परिस्थिती दिवसासारखी स्पष्टपणे दिसू शकेल, असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या रणगाड्यांमध्ये क्षेपणास्त्र, अणु युद्धात शत्रूचा मारा निष्प्रभ करण्याची क्षमता आहे. जवानांना वाहून नेण्यासाठी हे रणगाडे उपयुक्त ठरतात.

----------

रणगाडे सोबत सेल्फी काढण्याचा अधिकाऱ्यांनाही मोह

लष्करातर्फे आयोजित या युद्ध सरावात अनेक अधिकारी तसेच मित्र राष्ट्राच्या सैन्याचे अधिकारी आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रत्यक्षिकानंतर हे सर्व रणगाडे हे सराव पाहण्यासाठी आलेल्या प्रत्येकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. यावेळी सामान्य नागरिक रणगाड्यांसोबत फोटो काढत होते. त्यांच्या बरोबरच लष्करी अधिकारीही रणगाड्यावर चढून सैल्फही घेत होते.


----------

भारतीय सैन्यदलाचे लढाऊ कौशल्य दिपवून टाकणारे
आजच्या युद्ध प्रत्यक्षिकांनी आम्ही भारावून गेलो आहे. भारतीय लष्कराचे युद्ध कौशल्य अप्रतिम आहे. युद्धाच्या रणनीती आणि त्याची सैन्यानी केलेली अंमल बजावणी यातून आम्ही खूप काही शिकलो. अतिशय योग्य नियोजन आणि शिस्त यावेळी भारतीय जवानांनी दाखवली असे मत या सोहळ्याला उपस्तीत मित्र राष्ट्राच्या लष्करी अधिकाऱ्यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केली.

Web Title: Destroy enemy outposts by penetrating the Indian army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.