शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

"स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करूनही ते माफी मागत नाहीत, उलट...", नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 16:17 IST

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना सिंधुदुर्गातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळ्याप्रकरणी शिवरायांची जाहीर माफी मागितली. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. 

पालघर : केंद्र सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना सिंधुदुर्गातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळ्याप्रकरणी शिवरायांची जाहीर माफी मागितली. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. 

गेल्या काही काळापासून या भूमीचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सतत अपमान केला जातो. मात्र, त्यांनी कधी माफी मागितली नाही. उलट ते न्यायालयात जातात, पण त्यांना या गोष्टीचा पश्चात्ताप होत नाही, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गामध्ये जे काही घडलं ते दुर्दैवी होतं. माझ्यासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा महाराजा महापुरुष नाही आहेत. तर आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत. म्हणून मी आज माझे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांच्या चरणांवर मस्तक झुकवून माफी मागतो. 

याचबरोबर, आमच्यावर वेगळे संस्कार आहेत. आम्ही ते लोक नाही आहोत, जे या भारतमातेचे या भूमीवरील वीर सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द बोलत असतात. त्यांचा अपमान करतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपशब्द उच्चारूनही जे माफी मागायला तयार होत नाहीत. देशभक्तांच्या भावनांचा चुराडा करत आहेत. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करूनही ते माफी मागत नाहीत. उलट न्यायालयात जातात, पण त्यांना या गोष्टीचा पश्चात्ताप होत नाही. महाराष्ट्राची जनता आता त्यांच्या संस्कारांना ओळखत आहेत, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या प्रकल्पासाठी तब्बल ७६००० कोटी खर्च करण्यात येणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

देशातील सर्वात मोठे पोर्ट होणारया बंदरासाठी ७६ हजार कोटींहून अधिक जास्त रक्कम खर्च केली जाणार आहे. हे देशातील सर्वात मोठं कंटेनर पोर्ट असणार आहे. देशच नाही तर जगातील सर्वात मोठे पोर्ट असणार आहे. आज देशातील सर्व कंटेनर पोर्टातून जेवढे कंटेनर येतील जातील, संपूर्ण देशातील मी सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त कंटेनरचं काम एकट्या वाढवण बंदरात होणार आहे. तुम्ही अंदाज लावू शकता, हे पोर्ट महाराष्ट्र आणि देशाच्या व्यापाराचा औद्योगिक प्रगतीचे किती मोठे केंद्र होईल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpalgharपालघरBJPभाजपाcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार