“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:21 IST2025-11-19T14:19:21+5:302025-11-19T14:21:27+5:30
Deputy CM Eknath Shinde News: शेतकऱ्यांचा सन्मान, संस्कृतीचे संवर्धन आणि परंपरेला आधुनिकता देणे हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Deputy CM Eknath Shinde News:बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा आहे. ही परंपरा जगभर पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी पुढील कालावधीमध्ये प्रो बैलगाडा लीग सुरू करण्यात येईल. शेतकऱ्यांचा सन्मान, संस्कृतीचे संवर्धन आणि परंपरेला आधुनिकता देणे हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
गर्दीवरून सांगू शकतो की, ही शर्यत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल यात शंका नाही. बैलजोड्यांची संख्या, चाहत्यांची उपस्थिती, रेकॉर्ड ब्रेकिंग सहभाग आणि थरारक स्पर्धा हाच या वर्षीचा श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचे वैशिष्ट्य ठरले असे नमूद केले. परंपरा, श्रद्धा आणि भविष्यातील योजना शर्यतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रेरणा, रोजगार आणि आर्थिक पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. बैल हा शेतकऱ्याचा विश्वासू साथी आहे. बैलगाडा शर्यत म्हणजे मातीचा अभिमान. ती आपण जपलीच पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांनी पुढील काळात प्रो बैलगाडा लीग सुरू करण्याचा संकेत देत, योजनेच्या नेतृत्वाबाबत आयोजक चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या कार्यसंघाचे कौतुक केले.
गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य
शेतकरी कल्याण आणि शासन निर्णय संबंधित योजनांचा उल्लेख करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य. शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड, मनरेगातून अनुदान आणि कृषी पायाभूत सुविधा यांसाठी अतिरिक्त प्रकल्प राबविण्यात येत आहेत.
दरम्यान, ही मालक-नोकरांची संस्था नाही; हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातग्रस्त कुटुंबियांना ५ लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज, सैनिकांचा गौरव आणि देशभक्ती या प्रसंगी त्यांनी भारतीय लष्करासाठी शिबिर व रक्तदान मोहिमांचे उल्लेख करत देशभक्तीचा संदेश दिला. सीमेवरील जवानांची सेवा म्हणजे राष्ट्रसेवा. त्यांच्यासाठी महाराष्ट्र सदैव तयार आहे, असे ते म्हणाले.