शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

...अन् अजित पवारांना आठवला पहाटेचा 'तो' शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 4:53 PM

अजित पवारांची नाशिकमध्ये तुफान फटकेबाजी

नाशिक: देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांनी आज त्यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांच्या 'खळबळजनक' शपथविधीचा उल्लेख केला. इतक्या सकाळी होत असलेल्या कार्यक्रमाला अजित पवार येतील का, असा प्रश्न काहींनी पडला होता. त्यावर एकानं सकाळी लवकर झालेल्या शपथविधीची आठवण त्यांना करुन दिली, असं अजित पवार म्हणाले. यानंतर उपस्थितांना हसू आवरता आलं नाही. नाशिक दौऱ्यादरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळी लवकर भूमिपूजन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी अजित पवारांनी त्यांच्या भाषणात पहाटेच्या शपथविधीचा विनोदानं उल्लेख केला. 'काही जण चर्चा करत होते, मी इतक्या सकाळी येईन का? त्यावर एक जण म्हणाला, हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो,' असं अजित पवार म्हणाले. यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरू असताना, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सरकार स्थापनेसाठी बैठका सुरू असताना २३ नोव्हेंबरच्या पहाटे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजभवनात पोहोचले. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. याच शपथविधीचा संदर्भ देत अजित पवारांना नाशिकमध्ये जोरदार फटकेबाजी केली.'आज नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळ्यात मला बैठका घ्यायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला लवकर उठून यावं लागलं म्हणून मला माफ करा,' असं अजित पवार पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारबद्दलही भाष्य केलं. 'सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. मात्र समाजाच्या भल्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,' असं अजित पवार यांनी सांगितलं. 'माझे आणि अशोक चव्हाणांचे वाद सुरू असल्याचं वृत्त असल्याचं वृत्त खोटं आहे. शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे सरकार चालवण्यासाठी लक्ष देत आहेत,” असं म्हणत महाविकास आघाडीत सगळं आलबेल असल्याचं पवारांनी सांगितलं.  

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना