शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गृहखात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना अवमान नोटीस

By admin | Updated: May 4, 2016 02:50 IST

उच्च न्यायालयाने जानेवारीमध्ये १,८४३ ध्वनिमापन यंत्रे घेण्याचा आदेश देऊनही सरकारने काहीही हालचाल न केल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. राज्य सरकारने ध्वनिप्रदूषण नियमांची

मुंबई : उच्च न्यायालयाने जानेवारीमध्ये १,८४३ ध्वनिमापन यंत्रे घेण्याचा आदेश देऊनही सरकारने काहीही हालचाल न केल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. राज्य सरकारने ध्वनिप्रदूषण नियमांची थट्टा लावली आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांना अवमान नोटीस बजावली. ध्वनिप्रदूषण नियम, २००० ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयाने ४ जानेवारी रोजी राज्य सरकारला १,८४३ ध्वनिमापक यंत्रे तीन महिन्यांत खरेदी करण्याचा आदेश दिला होता. मात्र, मंगळवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी अद्याप ही यंत्रे खरेदी करण्यात आली नसल्याची माहिती न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाला दिली. खंडपीठाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘ध्वनिमापक यंत्रांशिवाय ध्वनिप्रदूषण नियमांची अंमलबजावणी करता येणार नाही, हा कॉमन सेन्स आहे. सरकारच्या या वर्तवणुकीवरून सरकार ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करण्याबाबत गंभीर आहे, असे आम्हाला वाटत नाही. सकृतदर्शनी हे जाणूनबुजून करण्यात आले आहे, असे आम्हाला वाटते,’ असे म्हणत खंडपीठाने के. पी. बक्षी यांना अवमान नोटीस बजावली.धार्मिक सणांच्या काळात मोठमोठ्याने ध्वनिक्षेपक लावून ध्वनिप्रदूषण नियमाचे उल्लंघन करण्यात येत असल्याबाबत ठाण्याच्या महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने जानेवारीमध्ये सरकारला ध्वनिमापक यंत्रे खरेदी करण्याचा आदेश दिला होता, तसेच धार्मिक सणांच्या वेळी ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी दिलेल्या ठिकाणी आवाजाची पातळी तपासण्याचे आदेश सर्व संबंधित प्राधिकरणांना द्या, असेही निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. यासाठी आवश्यक असलेली ध्वनिमापक यंत्रे राज्य सरकारने खरेदी करावीत, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करण्यासाठी सद्यस्थितीत सरकारकडे यंत्रणा नाही,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने बक्षी यांना १ जुलैपर्यंत अवमान नोटिशीला उत्तर देण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी) तुम्ही कर्तव्यात कसूर केलीराज्य सरकारने ही यंत्रे खरेदी करण्याऐवजी नगरविकास विभागाला सर्व महापालिकांनाच ही यंत्रे विकत घेण्याचे आदेश द्या, असे निर्देश दिले.पोलिसांसाठी ध्वनिमापक यंत्रे विकत घेण्याबाबत मौन बाळगले. सरकारच्या या वृत्तीबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.तुम्ही कर्तव्यात कसूर केली आहे, हेच यावरून दिसून येते. एकही ध्वनिमापक यंत्र विकत न घेता, ध्वनिप्रदूषण नियमांचे कसे पालन करणार? तुम्ही आदेशाचे पालने केले नाहीत.