दलित विद्यार्थी संघटनेवरील बंदीविरोधात निदर्शने

By Admin | Updated: June 2, 2015 01:57 IST2015-06-02T01:57:54+5:302015-06-02T01:57:54+5:30

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी मद्रासने (आयआयटी-एम) बहुतांश दलित विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या एका संघटनेची मान्यता काढून घेतल्यानंतर

Demonstrations against the ban on Dalit student organization | दलित विद्यार्थी संघटनेवरील बंदीविरोधात निदर्शने

दलित विद्यार्थी संघटनेवरील बंदीविरोधात निदर्शने

नवी दिल्ली/चेन्नई : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी मद्रासने (आयआयटी-एम) बहुतांश दलित विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या एका संघटनेची मान्यता काढून घेतल्यानंतर या विरोधातील निदर्शने सुरूच आहेत. आता या वादात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (रालोआ) मित्र पक्ष आरपीआय, अर्थात रिपब्लिकन पक्षानेही (आठवले गट) उडी घेतली आहे. विद्यार्थी संघटनेवरील कारवाई अयोग्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचे आरपीआयने म्हटले.
कथितरीत्या केवळ पंतप्रधान मोदी यांची विरोधक असल्यामुळे आंबेडकर पेरियार अभ्यास मंडळ (एपीएससी) या विद्यार्थी संघटनेवर बंदी घालण्यात आल्याचा आरोप आहे.
या निषेधार्थ सोमवारी चेन्नईत द्रमुक विद्यार्थी संघटनेच्या सुमारे २०० कार्यकर्त्यांनी याविरोधात निदर्शने केली. दिल्लीतील शास्त्री भवनाबाहेर डावेसमर्थित विद्यार्थी संघटनांनीही निषेध नोंदवला. याच ठिकाणी मनुष्यबळ विकास मंत्रालय आहे.
आरपीआय नेते रामदास आठवले यांनी ही कारवाई अन्यायकारक असून मनुष्यबळविकासमंत्री स्मृती इराणींनी ती तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. या संघटनेने पंतप्रधानांवर हल्ला केला असला तरीही ही कारवाई अन्यायकारकच ठरते. यासाठी मान्यता रद्द करणे, हा उपाय असू शकत नाही, असे ते म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Demonstrations against the ban on Dalit student organization