शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सत्तापक्षांत खडाखडी!

By admin | Updated: October 14, 2015 04:02 IST

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभावरून शिवसेना-भाजपा या दोन सत्ताधारी पक्षांत सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपाचा फड चांगलाच रंगला आहे

मुंबई : पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभावरून शिवसेना-भाजपा या दोन सत्ताधारी पक्षांत सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपाचा फड चांगलाच रंगला आहे. दोघेही परस्परांना ‘राष्ट्रभक्ती’चे धडे देत, एकमेकांचे पुरते वस्त्रहरण करत आहेत, तर दुसरीकडे सरकारमधून बाहेर पडणार नसल्याचे सांगत हे तर जणू ‘पेल्यातील वादळ’ असल्याचेच संकेत शिवसेनेने दिले.एके काळी भाजपाचे थिंक टँक असणारे सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला शाई फासून शिवसेनेने थेट सरकारलाच आव्हान दिल्याचे मानले जात असतानाच, शिवसेनेचा विरोध मोडीत काढून सरकारने कसुरींच्या पुस्तकाचे प्रकाशन यशस्वीरित्या पार पाडले. शिवाय, शाईफेकीच्या गुन्ह्यात काही शिवसैनिकांनाही अटक केली. त्यामुळे या प्रकरणात एकूणच फटफजित झाल्याने शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, ती साफ फेटाळण्यात आली. ‘शिवसेनेने सत्तेतून बाहेर का पडायचे? आमची राष्ट्रभक्ती भाजपाला टोचत असेल, तर त्यांनीच राजीनामा द्यावा. शिवसेनेखेरीज राज्य करून दाखवावे किंवा भ्रष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार चालवावे,’ असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले. ‘कालच्या घटनेमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली, विदेशी गुंतवणुकीवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्यावरही राऊत यांनी टिप्पणी केली. ‘शिवसेनेच्या प्रखर राष्ट्रवादी भूमिकेमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली नसून, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळेच महाराष्ट्राची बदनामी झाली,’ असे ते म्हणाले.‘सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांवर टीका करणे योग्य नाही,’ असे सांगत, ‘संपूर्ण घटनाक्रमाचा सरकारच्या स्थैर्यावर कोणताही विपरित परिणाम होणार नाही,’ असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. शिवसेनेकडून उमटलेल्या प्रतिक्रियेचा भाजपा प्रवक्त्यांनी चांगलाच समाचार घेतला. (विशेष प्रतिनिधी)>> मुख्यमंत्र्यांमुळेच बदनामी!मुंबई : शिवसेनेच्या प्रखर राष्ट्रवादी भूमिकेमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली नसून, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळेच महाराष्ट्राची बदनामी झाली, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. राऊत म्हणाले की, ‘शिवसेनेच्या सोमवारच्या आंदोलनामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेनेची प्रखर राष्ट्रवादी भूमिका अयोग्य ठरवण्यामुळेच महाराष्ट्र बदनाम झाला. पाकिस्तानची बेकायदेशीर घुसखोरी त्यांना कशी चालते. पाकिस्तानबाबतची शिवसेनेची भूमिका नवीन नाही. गेली ३० ते ३५ वर्षे आम्ही हीच भूमिका घेतली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी बस घेऊन लाहोरला गेले, तेव्हा शिवसेनेने विरोध केला होता. समझोता एक्स्प्रेस सुरू झाली, तेव्हाही शिवसेनेने तीव्र नापसंती व्यक्त केली होती. त्याच भूमिकेच्या अनुषंगाने कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाला विरोध केला, तर त्यामध्ये महाराष्ट्राची बदनामी कशी झाली, हा आमचा सवाल आहे.’‘लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम राष्ट्रवादी भूमिका घेतली. त्यांच्या वक्तव्यानेही महाराष्ट्राची बदनामी झाली, असे मुख्यमंत्री म्हणणार का?’ असा सवाल करून राऊत म्हणाले की, ‘उलटपक्षी कालच्या कसुरीविरोधी आंदोलनात भाजपा सहभागी झाला असता, तर त्यांचा प्रखर राष्ट्रवाद दिसला असता.’ (विशेष प्रतिनिधी)>>इतरांच्या मताचाही आदर करा - कुलकर्णीशिवसेनेच्या मुखपत्रातून मंगळवारी सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर बेलगाम टीका करण्यात आली. शिवसेनेला अशी टीका करण्याचा अधिकार असला, तरी इतरांच्या मतांचाही आदर करा, असे वक्तव्य सुधींद्र कुलकर्णी यांनी टिष्ट्वटरद्वारे केले.>>राऊत यांच्या पाकवारीचा समाचार ‘आमची राष्ट्रभक्ती सिद्ध करणारे अनेक दाखले आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत दोनवेळा पाकिस्तानात जाऊन आले, तेव्हा ते मित्रराष्ट्र होते का,’ असा सवाल भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला, तर ‘जावेद मियांदाद मातोश्रीवर गेला ते कसे चालले,’ असा सवाल आ. कदम यांनी केला. ‘डॉ. आंबेडकर स्मारक भूमिपूजनाकरिता ठाकरे यांना आमंत्रित करण्यासाठी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता मातोश्रीवर गेले. उद्योगमंत्री सुभाष देसाई समारंभासाठी येतील, असे त्यांना सांगण्यात आले, पण विचारांपेक्षा ‘इगो’ महत्त्वाचा ठरला,’ असा चिमटाही त्यांनी काढला. >>त्या शिवसैनिकांना शाबासकीआॅब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्या शिवसैनिकांना मंगळवारी मातोश्रीवर बोलावून त्यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ‘पाकिस्तानला पायघड्या घालणाऱ्या एजंटांचे तोंड काळे करून तुम्ही राष्ट्रभक्तीचे कार्य केले आहे. यापुढेही असेच काम करीत राहा,’ असे ठाकरे यावेळी म्हणाले.