शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्याचे निकष बदलण्याची मागणी

By admin | Updated: July 29, 2016 03:32 IST

राज्य सरकारच्या मागेल त्याला शेततळे या योजनेचे निकष, लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान आदी मुद्यांवर विरोधकांनी गुरुवारी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. योजनेचे निकष बदलून

मुंबई : राज्य सरकारच्या मागेल त्याला शेततळे या योजनेचे निकष, लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान आदी मुद्यांवर विरोधकांनी गुरुवारी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. योजनेचे निकष बदलून एक लाखापर्यंत वाढवावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. तथापि रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावळ यांनी सुस्पष्ट शब्दात उत्तर टाळल्याने अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही त्यांना फटकारले आणि जर ५० हजारात शेततळे होत नसताना अनुदानाची रक्कम सरकार का वाढवित नाही, अशी विचारणा केली.प्रश्नोत्तराच्या तासात हा विषय प्रतापराव पाटील चिखलीकर यानी उपस्थित केला होता. त्यावरील चर्चेत भाग घेताना अजित पवार यांनी या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे निदर्शनास आणून दिले. राज्यात १ कोटी ३७ लाख शेतकरी असून त्यापैकी केवळ एक लाख ५० हजार शेतकरी अर्ज करतात म्हणजे योजना पूर्णपणे अयशस्वी झाल्याचे स्पष्ट होते. शेततळ्यास ८० हजार रुपये खर्च येतो, प्लॅस्टीक कागदाची किंमत वेगळी असते. त्यामुळे ही अनुदानाची रक्कम एक लाख करावी अशी मागणी त्यांनी केली. योजनेसाठी प्राप्त प्रस्तावावर लवकर निर्णय होत नसल्याने बरेच दिवस प्रलंबित रहात असल्याचे शंभूराजे देसाई यांनी सांगितले. मंत्री रावळ यांनी ५१ हजाराचे उद्दीष्ट असताना दीड लाख अर्ज प्राप्त झाले, त्यामुळे योजनेस शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला असल्याचा दावा केला. त्याला विरोधकांनी आक्षेप घेतला. जयंत पाटील यांनी ही योजना मागेल त्याला शेततळे असे नाव असेल तर लक्षांश कसा ठरविला, अशी विचारणा केली. प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त डोंगरी भागाचा योजनेत समावेश करावा अशी मागणी केली. (प्रतिनिधी)मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत मौनवारंवार मागणी करुनही मंत्री रावळ त्याला बगल देतअसल्याचे निदर्शनास येताच त्यांना अध्यक्ष बागडे यांनी अनुदानाची रक्कम वाढविणार की नाही हे सांगा अशा शब्दात त्यांना खडसावले. त्यानंतर रावळ यांनी पुढील वर्षापासून अनुदानाची रक्कम वाढवून देण्याबाबत विचार केला जाईल, असे सांगून चर्चेवर पडदा टाकला.