शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

धुक्यामुळे रेल्वेगाड्यांना विलंब

By admin | Updated: January 1, 2015 01:27 IST

दिल्ली आणि इतर मार्गावर धुके पडल्यामुळे रेल्वेगाड्या १८ तास विलंबाने धावत आहेत. दरम्यान उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना रेल्वेगाड्यांची वाट

प्रवाशांची गैरसोय : वेटिंग रुम झाल्या फुल्लनागपूर : दिल्ली आणि इतर मार्गावर धुके पडल्यामुळे रेल्वेगाड्या १८ तास विलंबाने धावत आहेत. दरम्यान उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना रेल्वेगाड्यांची वाट पाहात ताटकळत बसण्याची पाळी आली असून रेल्वेस्थानकावरील वेटिंग रुम फुल्ल झाल्याची स्थिती आहे.मागील आठ दिवसांपासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दाट धुके पडल्यामुळे रेल्वेगाड्यांच्या लोकोपायलटला समोरील सिग्नल दिसणे कठीण झाले आहे. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असल्यामुळे धुके ओसरल्यानंतर रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. दरम्यान बुधवारी उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यात रेल्वेगाडी क्रमांक १२४१० हजरत निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस १४.३० तास, १२७२४ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस ११ तास, १२६१५ चेन्नई-नवी दिल्ली ग्रँड ट्रंक एक्स्प्रेस १८ तास, १२६१६ नवी दिल्ली-चेन्नई ग्रँड ट्रंक एक्स्प्रेस १६ तास, १२६२१ चेन्नई-नवी दिल्ली तामिळनाडू एक्स्प्रेस ४.४५ तास, १२६२२ नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस ६ तास, १६३६० पटना-एर्नाकुलम एक्स्प्रेस १३ तास, २२६९३ बेंगळुरू-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस ४ तास, १२२९६ पटना-बेंगळुरू संघमित्रा एक्स्प्रेस ६ तास आणि १२५७७ दरभंगा-म्हैसूर बागमती एक्स्प्रेस २ तास उशिराने धावत आहे. दरम्यान उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना रेल्वेस्थानकावर ताटकळत बसण्याची पाळी आली आहे. आणखी काही दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)