शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीची आकडेवारी फसवी - काँग्रेसचा आरोप

By admin | Updated: July 5, 2017 04:46 IST

शेतकरी कर्जमाफी संदर्भात सातत्याने अतिरंजीत आकडेवारी देऊन सरकार राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. १० हजाराची

लोकमत न्यूज नेटवर्र्कमुंबई : शेतकरी कर्जमाफी संदर्भात सातत्याने अतिरंजीत आकडेवारी देऊन सरकार राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. १० हजाराची उचल देण्याच्या योजनेचा फायदा फक्त १०८२ शेतकऱ्यांनाच मिळाला, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.संपूर्ण कर्जमाफी ३४ हजार कोटींची नसून फक्त ५ हजार कोटींचे आहे. तसेच ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसून केवळ १५ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मागील दहा ते १२ वर्षाची आकडेवारी दाखवून प्रत्यक्ष कर्जमाफीचा कार्यकाळ फक्त चार वर्षांचा ठेवायचा असा उद्योग उद्योग शासनाने केला आहे, असा आरोप करुन सावंत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी रात्री जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार फक्त ३६ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. त्यातही या ३६ लाख शेतकऱ्यांमध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातल्या लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश पाहून राज्य शासन किती धादांत असत्य बोलत आहे हे स्पष्ट झाले आहे. मुंबई शहरात शेतजमीनच नाही तर शेतकरी कुठून आले? असा सवाल सावंत यांनी केला. एकूण कर्जदार शेतकऱ्यांपेक्षा मुख्यमंत्र्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांनी दिलेली संख्या जास्त असल्याचे सावंत म्हणाले.