शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

पाणी सोडण्याबाबत निर्णय राखीव

By admin | Updated: October 27, 2015 01:56 IST

नाशिक, अहमदनगर व मराठवाड्यात पाणी वाटपावरून वातावरण कमालीचे तापले आहे. त्यातच राज्य जलनियामक प्राधिकरणाने पाणी वाटपाची जबाबदारी

मुंबई : नाशिक, अहमदनगर व मराठवाड्यात पाणी वाटपावरून वातावरण कमालीचे तापले आहे. त्यातच राज्य जलनियामक प्राधिकरणाने पाणी वाटपाची जबाबदारी गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळावर सोपवल्याने, उच्च न्यायालयाने सोमवारी प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले. पाणी वाटपासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे प्राधिकरण गांभीर्याने पाहत नसल्याने, राज्य सरकारनेच आता हा विषय हाताळावा, असे संतप्त झालेल्या खंडपीठाने म्हटले. उच्च न्यायालयाने पाणी वाटपावरील निर्णय शुक्रवारपर्यंत राखून ठेवला आहे.मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने (जीएमआयडीसी) घेण्यापूर्वी राज्य जलनियामक प्राधिकरणाने १९ सप्टेंबरला कोणत्या जिल्ह्याला किती पाणी सोडायचे, यासंबंधी संपूर्ण माहिती मागवली होती. त्यानंतर १५ आॅक्टोबरला समन्यायी पाणी वाटपाचा आदेश ‘जीएमआयडीसी’ला दिला. सोमवारी सुनावणीवेळी न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाने यासंबंधी प्राधिकरणावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या. माहिती मागवली, तर निर्णय घेतलात का? फाईल दाखवा, असे निर्देश खंडपीठाने प्राधिकरणाला दिले. मात्र, अधिकाऱ्यांकडे यासंबंधीची फाईल नव्हती, तसेच निर्णय घेतला की नाही, यावर प्राधिकरणाकडे काहीच ठोस उत्तरही नव्हते. त्यावर निर्णय घ्यायचा नव्हता तर माहिती का मागवली? असे शब्दांत खंडपीठाने फटकारले.प्राधिकरणावर ताशेरे ओढताना न्यायालयाने म्हटले की, ‘आमच्या एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर प्राधिकरणाने दिलेले नाही. पाण्याचा प्रश्न सोडवणाऱ्या राज्यातील सर्वोच्च प्राधिकरणाकडून असे घडणे योग्य नाही. प्राधिकरणाकडे तज्ज्ञ मंडळी आहेत.’पाण्याचा प्रश्न पेटला असताना, त्यांनी पाणी वाटपाबाबत तातडीने निर्णय घेणे योग्य ठरले असते. मात्र, त्यांनी केवळ माहिती मागवली. कोणताही निर्णय घेतला नाही. इतका महत्त्वाचा प्रश्न प्राधिकरण गांभीर्याने का घेत नाही?, असे विचारत राज्य सरकारनेच आता या प्रकरणी लक्ष घालावे, अशा शब्दांत खंडपीठाने प्राधिकरणाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. (प्रतिनिधी)