शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात निर्णय घ्या, अन्यथा मुंबईतील मोर्चात उद्रेक

By admin | Updated: September 26, 2016 21:36 IST

मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चे निघत आहेत

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 26 - मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चे निघत आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात येत आहे. राज्यभरातील मागण्या सारख्याच आहेत. असे असताना शासन मोर्चेकऱ्यांशी चर्चा करू, असे म्हणत आहे. आमच्याशी चर्चा करण्याऐवजी मागण्या पूर्ण करा, अन्यथा मुंबईत होणाऱ्या मोर्चात समाजबांधवांचा उद्रेक होईल, असा इशारा दहा ते बारा मराठा संघटनांनी सोमवारी औरंगाबादेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ ९ आॅगस्ट रोजी औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा झाला. अहिंसा, शिस्त आणि स्वच्छतेचा संदेश या मोर्चातून संपूर्ण राज्याला दिला. मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करणाऱ्या मराठा संघटनांच्या विविध पदाधिकाऱ्यांची सोमवारी येथे बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र काळे आणि राजेंद्र जंजाळ म्हणाले की, संपूर्ण राज्यात मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. हे सर्व मोर्चे शांततेच्या मार्गाने होत आहेत. मात्र, कोपर्डीची घटना, मराठा आरक्षणाचा प्रश्न, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर याबाबत मराठा समाजात तीव्र संताप आहे. कोणत्याही घटनेत ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक आहे. मात्र या प्रकरणात नियुक्त करण्यात आलेल्या आयपीएस महिला अधिकाऱ्यांनी अद्यापही पीडितेच्या आई-वडिलांचा जबाब नोंदविला नाही. आम्ही अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात काळानुसार बदल करण्याची मागणी करीत आहोत. अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची आमची मागणी नाही. असे असताना काही लोक याबाबत अफवा पसरवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार, असे मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत. मात्र, आजपर्यंत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणावर एकदाही चर्चा केलेली नाही. तसेच शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी स्वामीनाथन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्या आहेत.चर्चा कशाला? निर्णय घ्या...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा मोर्चांच्या नेत्यांशी चर्चा करणार, असे वारंवार सांगत आहेत. आमच्या या मोर्चाला नेता नाहीच. मराठा मोर्चाचे नेतृत्व हे संपूर्ण समाज करीत आहे. मग तुम्ही चर्चा कोणासोबत करणार, असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या निवेदनातील मागण्यांसंदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा, असे आवाहन संघटनांनी केले.या पत्रकार परिषदेला किशोर चव्हाण, अप्पासाहेब कुढेकर, अभिजित देशमुख, विनोद पाटील, राहुल बनसोड, किशोर थोरात, रवी सोडतकर, प्रा.प्रदीप सोळुंके, संजय सावंत, ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश केरे, नगरसेवक विजय औताडे, राज वानखेडे, सखाराम काळे आदींची उपस्थिती होती.मराठा क्रांती मोर्चासंदर्भात ३० रोजी मुंबईत बैठकराज्यभरातील मोर्चानंतर मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोर्चाची तयारी करण्यासाठी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चा समन्वय पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक ३० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दादर येथील शिवाजी नाट्यगृहात आयोजित करण्यात आली आहे.