शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्त नव्हे, कर्जबाजारी केले!

By admin | Updated: June 3, 2014 02:19 IST

नाशिक महापालिकेत खूप कामे केली; परंतु ती लोकांसमोर नीट मांडता आली नाही, असे सांगणा:या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेवरील साडेसहाशे कोटी रुपयांचे कर्ज फेडल्याचा दावा केला

चुकीचा दावा : नाशिक मनपाबाबत राज यांचाच गैरसमज
नाशिक : नाशिक महापालिकेत खूप कामे केली; परंतु ती लोकांसमोर नीट मांडता आली नाही, असे सांगणा:या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेवरील साडेसहाशे कोटी रुपयांचे कर्ज फेडल्याचा दावा केला खरा; परंतु मनसे सत्तेवर आली तेव्हा अशा प्रकारचे कोणतेही कर्ज पालिकेवर नव्हते. उलट गेल्या दोन वर्षात मनसेच्या कारकिर्दीत तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे लोकांचा गैरसमज दूर करता करता प्रत्यक्षात राज ठाकरे यांचाच गैरसमज झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवारांचा दारुण पराभव झाल्यानंतर राज ठाकरे यांनी शनिवारी सोमय्या मैदान येथे प्रथमच जाहीर सभा घेतली आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी नाशिकमध्ये मनसेचे काम समाधानकारक नसल्याने वेळोवेळी होणा:या प्रश्नांच्या सरबत्तीला राज यांनी उत्तर दिले. महापालिकेवर साडेसहाशे कोटी रुपयांचे कर्ज होते, ते फेडले आणि इतकेच नव्हे तर यामुळे मोठी विकासकामे करता आली नाही, असा अप्रत्यक्ष दावा राज ठाकरे यांनी केल्याने पालिका वर्तुळातील सारेच जण बुचकळ्यात पडले आहेत. 
मनसेची सत्ता आली तेव्हा महापालिकेवर साडेसहाशे कोटी रुपयांचे कोणतेही कर्ज नव्हते. महापालिकेने आजवर सर्वाधिक शंभर कोटी रुपयांचे कर्ज काँग्रेसच्या शोभा बच्छाव महापौर असताना काढले होते. कर्जरोख्याच्या माध्यमातून काढलेले हे कर्ज शिवसेनेचे दशरथ पाटील महापौर असताना फेडले होते. त्यानंतर पालिकेवर कोणतेही कर्ज नाही.
 
गेल्या दोन वर्षात मनसेची सत्ता आल्यानंतर आधी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास महापालिकेला राज्य शासनाने मान्यता दिली. त्यानंतर अलीकडेच आणखी दीडशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास मान्यता दिली. त्यानुसार कर्ज काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. 
 
तो स्पील ओव्हर होता..
राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला मुद्दा स्पील ओव्हरचा असू शकेल. पालिकेत निधीचा विचार न करता नागरी कामे मंजूर केली जातात; परंतु निधीची अडचण आली की ही कामे कार्यवाहीत अडकतात. अंदाजपत्रकात त्याचे आर्थिक दायित्व दर्शविले जाते. त्यालाच स्पील ओव्हर म्हणतात. ही कामे केली असल्याचा दावा कदाचित मनसेचा असू शकेल; परंतु त्यात विशेष असे काहीच नसते. मनसेने दायित्व कमी केले याचाच अर्थ असा की, शिवसेना-भाजपाच्या गेल्या पंचवार्षिकमधील साडेसहाशे कोटी रुपयांची कामे मार्गी लागली आणि त्या बदल्यात मनसेने नवीन कामेच केली नाहीत असा होतो. त्यामुळे मनसेने काढलेला मुद्दा प्रचाराचा की अपप्रचाराचा, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.