घरगुती कारणावरून सुनांमध्ये वाद, एकीचा खून

By Admin | Updated: December 3, 2014 00:30 IST2014-12-03T00:30:13+5:302014-12-03T00:30:13+5:30

खामगावातील घटना.

Debate on domestic reason, blood of one murderer | घरगुती कारणावरून सुनांमध्ये वाद, एकीचा खून

घरगुती कारणावरून सुनांमध्ये वाद, एकीचा खून

खामगाव : एकाच कुटुंबातील दोन सुनांमध्ये घरगुती कारणावरून वाद होऊन, एकीने दुसरीचा खून केल्याची घटना मंगळवारी खामगाव येथे घडली.
खामगाव शहरातील शिवाजी नगर पोलिस स्टेशननजीक वसंधानी कुटुंबातील कमलेश व राजेश वसंधानी यांचे संयुक्त कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील दोन्ही भावांच्या पत्नी, सौ. गायत्री कमलेश वसंधानी (वय ३३) व सौ.सुनीता राजेश वसंधानी (वय ३१) यांच्यात मंगळवारी घरगुती कारणावरुन वाद झाला. या वादात सौ.सुनीताने सौ.गायत्रीच्या पोटावर चाकुने वार केले, तसेच डोक्यावर हातोडा मारला. त्यामुळे सौ.गायत्री जागीच गतप्राण झाल्या. याप्रकरणी कमलेश पुरुषोत्तम वसंधानी यांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी सौ. सुनीता हिच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन तिला अटक केली.
विशेष म्हणजे, या घटनेनंतर आरोपी सौ.सुनीता हिने स्वत: शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये जावून हल्ल्याचा बनाव केला. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन सौ.गायत्री हिच्या अंगावरील दागिने लंपास केले, तसेच चाकू व हातोडीने वार करुन जीवे मारले, अशी बतावणी तिने पोलिसांजवळ केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. त्यानंतर सौ.सुनीता हिला पोलिसी खाक्या दाखवताच, तिने खूनाची कबुली दिली.

Web Title: Debate on domestic reason, blood of one murderer