परभणीत रेल्वे प्रवासात चोरट्यांच्या हल्ल्यात महिला प्रवाशाचा मृत्यू

By Admin | Updated: November 10, 2015 10:43 IST2015-11-10T10:43:24+5:302015-11-10T10:43:24+5:30

परभणीजवळ अकोला परळी रेल्वे पॅसेंजरमध्ये मंगळसूत्र चोरट्यांना प्रतिकार करणा-या महिला प्रवाशाचा चोरट्यांनी केलेल्या चाकूहल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली.

Death of a woman passenger on a trip to Parbhani by a thief | परभणीत रेल्वे प्रवासात चोरट्यांच्या हल्ल्यात महिला प्रवाशाचा मृत्यू

परभणीत रेल्वे प्रवासात चोरट्यांच्या हल्ल्यात महिला प्रवाशाचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

परभणी, दि. १० - परभणीजवळ अकोला परळी रेल्वे पॅसेंजरमध्ये मंगळसूत्र चोरट्यांना प्रतिकार करणा-या महिला प्रवाशाचा चोरट्यांनी केलेल्या चाकूहल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. सविता कापसे असे या महिलेचे नाव असून त्या हिंगोली तहसील कार्यालयात लिपीक म्हणून कार्यरत होत्या.

दिवाळीनिमित्त सविता कापसे या माहेरी निघाली होती. अकोला परळी रेल्वे पॅसेंजरमधून प्रवास करत असताना मंगळसूत्र चोरट्यांनी सविता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. सविता यांनी धाडस दाखवत चोरट्यांना प्रतिकारही केला. सवितांनी प्रतिकार केल्यानंतर चोरट्यांनी सविता यांच्या गळ्यावर चाकूने वार केला व तिथून पळ काढला. या हल्ल्यात सविता यांचा मृत्यू झाल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.  

Web Title: Death of a woman passenger on a trip to Parbhani by a thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.