बेस्ट बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

By Admin | Updated: October 9, 2016 02:04 IST2016-10-09T02:04:59+5:302016-10-09T02:04:59+5:30

बेस्ट बसने दिलेल्या धडकेत एका वृद्ध मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी घडला असून बांगूरनगर पोलिसांनी बसचालकाला अटक केली आहे.

Death of oldest bus driver | बेस्ट बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

बेस्ट बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

मुंबई : बेस्ट बसने दिलेल्या धडकेत एका वृद्ध मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी घडला असून बांगूरनगर पोलिसांनी बसचालकाला अटक केली आहे. तसरुल सय्यद असे अटक करण्यात आलेल्या बसचालकाचे नाव आहे.
बांगूरनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास मालाड पश्चिमेच्या लिंक रोड परिसरात असलेल्या बाटा शोरूमच्या समोर हा प्रकार घडला.
मालाड पूर्वेच्या बच्चनीनगर या ठिकाणी राहणारे जोसेफ धारीयल (६२) यांचा या अपघातात मृत्यू झाला. ते मोटारसायकलवरून निघाले होते. त्या वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या बसच्या मागच्या टायरखाली ते आले. त्यांना तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Death of oldest bus driver