शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार पांडुरंग ढोले यांचे अपघाती निधन

By admin | Updated: April 6, 2017 18:14 IST

चांदूररेल्वे येथील माजी आमदार तथा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. पांडुरंग ढोले यांचे अपघाती निधन झाले आहे.

ऑनलाइन लोकतअमरावती, दि. 6 : धामणगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग ढोले यांचे वाहन चालविताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पश्चात त्यांची चारचाकी रस्त्याच्या कडेला कडुलिंबाच्या झाडावर आदळली. ही घटना गुरूवारी सकाळी ६ वाजता टेंभुर्णी गावानजीक घडली. 

पांडुरंग ढोेले हे मुंबईतील जनता दल कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होऊन गुरूवारी पहाटेच विदर्भ एक्सप्रेसने मुंबईहून चांदूररेल्वेला परतले होते. त्यानंतर स्वत:च्या कारने ते त्यांच्या कुऱ्हा येथील फार्म हाऊसकडे जाताना ही घटना घडली. हृदयविकाराने निधन झाल्यानंतर त्यांचे वाहन अपघातग्रस्त झाले. घटनेची माहिती त्यांचे सुपुत्र क्रांतीसागर ढोले यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पांडुरंग ढोलेंना अमरावती येथील रूग्णालयात आणताना वाटतेच त्यांचा मृत्यू झाला. पांडुरंग ढोले यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त चांदूररेल्वे व धामणगाव तालुक्यासह जिल्ह्यात पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली. जनता दलाच्या कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा क्रांतीसागर, दोन मुली नम्रता, सोनल चौधरी, जावई, नातवंडांसह मोठा आप्त परिवार आहे. अशी गाजविली राजकीय कारकीर्दपांडुरंग ढोले यांनी धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्राचे सन १९९९ साली प्रतिनिधित्व केले. सन १९९४ पर्यंत ते काँग्रेसचे पदाधिकारी होते. त्यानंतर त्यांनी जनता दलात प्रवेश घेतला. त्यांनी चांदूररेल्वे बाजार समितीचे सभापतीपद, गृहनिर्माण संस्था आणि प्रभात शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्षपदही सांभाळले. दलित, पीडित, शेतकरी, शेतमजूर, ओेबीसी महासंघाचा लढवय्या नेता म्हणून त्यांनी जिल्ह्यात ओळख निर्माण केली होती. राज्य पर्यटन महामंडळाचे संचालकपदही त्यांनी भूषविले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ चांदूररेल्वेत निघालेल्या काँग्रेसच्या मोर्चाच्या वेळी पोलीस ठाण्यातील सब इन्सपेक्टर जळीत प्रकरणात ते प्रमुख आरोपी होेते. हा खटला राज्यभर गाजला होता, हे विशेष. मात्र, यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. विदर्भ एक्सप्रेसला चांदूररेल्वेत थांबा मिळवून देण्याचे सर्वस्वी श्रेय त्यांच्या पाठपुराव्याला व आंदोलनालाच आहे.