शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण वीजवाहिन्या ठरताहेत जीवघेण्या

By admin | Updated: July 14, 2017 03:07 IST

पनवेल महापालिका हद्दीतील व तालुक्यातील विजेच्या तारा नागरिकांसाठी जीवघेण्या ठरू लागल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील व तालुक्यातील विजेच्या तारा नागरिकांसाठी जीवघेण्या ठरू लागल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांत तळोजा परिसरातील किरवली व पेंधर भागातील विजेच्या तारा तुटल्याने दोघांचा जीव गेला आहे. नागरिकांनी भिंगारी येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता. त्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.पनवेलच्या ग्रामीण भागातील महावितरणचे तीनतेरा वाजले आहेत. अनेक भागातील सडलेले विजेचे खांब कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत, तर काही खांब वाकलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे याठिकाणी आणखी मोठी जीवितहानी होऊ शकते. खंडित वीजपुरवठा, गंजलेले विजेचे खांब, जुनाट वीजवाहक तारा अशा अनेक समस्यांना ग्रामीण भागातील महावितरणच्या ग्राहकांना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामीण भागातील वीज यंत्रणा जुनाट झाली आहे. काही ठिकाणच्या विजेच्या खांबांना वेलींनी आलिंगन घातले आहे, तर बहुतांश ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळताना दिसत आहेत. विजेच्या तारा तुटणे, खांब पडणे यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा नेहमीच खंडित होतो. त्यामुळे ग्रामीण भागात महावितरणचा भोंगळ कारभार पाहावयास मिळत आहे. बहुतांश डीपींना झाकणे नाहीत तर काही डीपी दिवस-रात्र उघड्या आहेत. त्यामुळे मोठा अपघात घडू शकतो. विजेच्या खांबांमध्ये असलेले जास्त अंतर यामुळे काही ठिकाणी तारा लोंबकळल्या आहेत. जीर्ण खांब व तारा कधीही पडून मोठा अपघात होऊ शकतो. मात्र महावितरण या गोष्टींकडे गांभीर्याने पाहत नसल्याने गेल्या १५ दिवसांत तारा पडल्याने दोघांचा नाहक जीव गेला आहे. आणखी किती नागरिकांचा जीव गेल्यावर महावितरण जागे होईल, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीजचोरी देखील सुरूच आहे. मीटरमध्ये फेरफारकडून वीज चोरी करण्यात येत आहे. सडलेले खांब, लोंबकळलेल्या विजेच्या तारांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन जीर्ण विद्युत तारा व विजेचे खांब तत्काळ बदलावेत अशी येथील जनतेची मागणी आहे. पावसाळ्यात विजेच्या तारा पडल्यामुळे जीवितहानी होण्याच्या घटना घडल्या असताना देखील महावितरण कधी जागे होणार, असा सवाल स्थानिक विचारत आहेत. याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांच्याशी संपर्क साधला असता बैठकीत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.