शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या ओळखीचा घेतला गैरफायदा

By admin | Updated: May 2, 2015 10:16 IST

अ‍ॅण्टॉप हिल येथे पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या मोहम्मद रियाझ अली अन्सारी (३२) याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

मुंबई : अ‍ॅण्टॉप हिल येथे पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या मोहम्मद रियाझ अली अन्सारी (३२) याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ५ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. मोहम्मद अन्सारी कपड्यांच्या कारखान्यात कामाला होता. पिडीत मुलीची आई देखील याच ठिकाणी काम करत होती. पीडित मुलगी आईसोबत कारखान्यात जात असे. आरोपीसोबत तिची तोंड ओळख असल्याने तिने तत्काळ या आरोपीकडे धाव घेतली. याच दरम्यान आरोपीने तिला वडाळा परिसरातील निर्जन ठिकाणी नेले. या ठिकाणी त्याने या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिथून पळ काढला. वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली होती. सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र तयार केले होते. सीसीटिव्ही फुटेजमध्ये मध्ये पीडीत मुलगी ही आरडाओरडा न करताच आरोपीसोबत जात असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे हा माणूस ओळखीतलाच असावा असा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र तिच्या आईला दाखवले. या रेखाचित्रामध्ये दिसणारा चेहरा आरोपीच्या चेहऱ्याशी मिळत असल्याने तिच्या आईने तात्काळ पोलिसांना या आरोपीचे नाव सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ या आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपीला पीडीत मुलीने ओळखल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)