मुलीच्या ओळखीचा घेतला गैरफायदा

By Admin | Updated: May 2, 2015 10:16 IST2015-05-02T05:53:00+5:302015-05-02T10:16:39+5:30

अ‍ॅण्टॉप हिल येथे पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या मोहम्मद रियाझ अली अन्सारी (३२) याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

The daughter's acquaintance took advantage | मुलीच्या ओळखीचा घेतला गैरफायदा

मुलीच्या ओळखीचा घेतला गैरफायदा

मुंबई : अ‍ॅण्टॉप हिल येथे पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या मोहम्मद रियाझ अली अन्सारी (३२) याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने
त्याला ५ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
मोहम्मद अन्सारी कपड्यांच्या कारखान्यात कामाला होता. पिडीत मुलीची आई देखील याच ठिकाणी काम करत होती. पीडित मुलगी आईसोबत कारखान्यात जात असे. आरोपीसोबत तिची तोंड ओळख असल्याने तिने तत्काळ या आरोपीकडे धाव घेतली. याच दरम्यान आरोपीने तिला वडाळा परिसरातील निर्जन ठिकाणी नेले. या ठिकाणी त्याने या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिथून पळ काढला. वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली होती. सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र तयार केले होते. सीसीटिव्ही फुटेजमध्ये मध्ये पीडीत मुलगी ही आरडाओरडा न करताच आरोपीसोबत जात असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे हा माणूस ओळखीतलाच असावा असा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र तिच्या आईला दाखवले. या रेखाचित्रामध्ये दिसणारा चेहरा आरोपीच्या चेहऱ्याशी मिळत असल्याने तिच्या आईने तात्काळ पोलिसांना या आरोपीचे नाव सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ या आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपीला पीडीत मुलीने ओळखल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The daughter's acquaintance took advantage