बंडखोरांच्या विरोधामुळे अस्वस्थ 'भरणेमामां' ची निवडणूक रिंगणातुन माघार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 05:42 PM2019-10-02T17:42:22+5:302019-10-02T18:14:08+5:30

इंदापुरच्या राजकारणात खळबळ... 

dattray bharne withdrawal from election due to rebel in ncp | बंडखोरांच्या विरोधामुळे अस्वस्थ 'भरणेमामां' ची निवडणूक रिंगणातुन माघार 

बंडखोरांच्या विरोधामुळे अस्वस्थ 'भरणेमामां' ची निवडणूक रिंगणातुन माघार 

Next
ठळक मुद्देउमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले असताना भरणे यांचा निर्णय

इंदापुर : इंदापुर तालुक्यात राष्ट्रवादी काँंग्रेसमधील बंडखोर गटाने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विधानसभेच्या उमेदवारीला सातत्याने विरोध कायम ठेवला आहे. विरोधामुळे अस्वस्थ झालेले  इंदापुर चे आमदार  दत्तात्रय भरणे यांनी आपण इंदापूर विधानसभेची निवडणूक लढविणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.याबाबत आमदार भरणे यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले असताना भरणे यांनी हा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भांबावुन गेले आहेत. आघाडीमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी आमदार भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच होती. याच दरम्यान आघाडीकडुन विधानसभेसाठी डावलले जाण्याच्या भीतीमधुन माजी मंत्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेकडे असणारा हा पारंपारिक मतदार संघ भाजपकडे घेवुन पाटील यांना भाजपची उमेदवारी जाहिर केली आहे.त्यानंतर भाजप चे ठरले,राष्ट्रवादीचे कधी ठरणार,याबाबत राजकीय चर्चा रंगल्या होत्या.याच दरम्यान विधानसभा निवडणुक लढविण्याबाबत भरणे यांचा 'नकारबाँब' पडल्याने खळबळ उडाली आहे.
  भरणे यांच्या नकारारात्मक  भुमिकेमागे राष्ट्रवादीचा बंडखोरांचा गट असल्याचे मानले जाते. कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेग जगदाळे यांच्यासह ७ जण आमदारकीसाठी इच्छुक आहेत.त्यामुळे या सातजणांनी भरणे यांच्या उमेदवारीला विरोध करण्याची भुमिका घेतली होती.याबाबत संबंधितांनी मेळावे घेत भरणे यांच्या उमेदवारीला विरोध करण्याचे सत्र सुरुच ठेवले.त्यामुळे अस्वस्थ झालेल्या भरणे यांनी आता विधानसभेच्या रिंगणातुन माघार घेण्याची भूमिका घेतली आहे.
दरम्यान,भरणे समर्थकांनी त्यांच्या भूमिकेला विरोध दर्शवित त्यांच्या निवासस्थानी ठिय्या  देण्याचा निर्धार केला आहे. भरणे यांचे मन वळवत त्यांचा होकार मिळविण्यासाठी इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आमदार  भरणे  समर्थक त्यांच्या अंथुर्ण भरणेवाडी येथील निवासस्थानी गुरुवारी(दि ३) एकत्रित येणार आहेत.याबाबत सोशल मीडियावर संदेश व्हायरल करण्यात आले आहेत.
————————————————

Web Title: dattray bharne withdrawal from election due to rebel in ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.