शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणी अभियानाला बीएलओंची ‘दांडी’

By admin | Updated: June 28, 2014 23:43 IST

मतदार नोंदणी अभियानाचा केंद्रस्तरिय अधिकार्‍यांनी पुरता फज्जा उडविला आहे.

वाशिम : मतदान आयोगाने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या मतदार नोंदणी अभियानाचा केंद्रस्तरिय अधिकार्‍यांनी पुरता फज्जा उडविला आहे. २८ व २९ जूनचे विशेष अभियानही यातून सुटले नाही. उभय दिवशी प्रत्येक केंद्रस्तरिय कर्मचार्‍यांनी ११ ते पाच वाजेपर्यंत केंद्रावर उपस्थित राहून मतदारांची नोंदणी करून घ्यावी असे आयोगाचे स्पष्ट आदेश असतानाही बीएलओंनी या आदेशांना धाब्यावर बसविले . लोकमतने केलेल्या स्टिंग मध्ये बहुतांश मतदान केंद्र २८ जून रोजी कुलुपबंद आढळून आले.एप्रिलमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत सदोष निवडणूक याद्यांचा मुद्दा कमालीचा गाजला होता. अनेक मतदारांचे अचानक मतदान यादीतून नावे गहाळ झाली होती तर अनेकांच्या मतदान केंद्रांमध्ये बदल झाले होते. यादीतील हे दोष दुर करून नविन मतदारांची नोंदणी करून घेण्यासाठी मतदान आयोगाने ९ जूनपासून मतदान नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. २८ व २९ या दोन दिवस विशेष अभियानही राबविण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही दिवशी संबधित केंद्रस्तरिय अधिकार्‍याला सकाळी ११ वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदार नोंदणी करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. मात्र जिल्ह्यातील केंद्रस्तरिय अधिकार्‍यांनी आयोगाच्या या आदेशांना केराची टोपली दाखविली आहे. आज वेिशष अभियानाचा पहिल्या दिवशीच बहुतांश बिएलओंनी मतदान केंद्रावरून दांडी मारली होती. नागरिक आपले मतदार नोंदणी अर्ज घैऊन या बीएलओंना शोधत होते. लोकमतने केलेल्या स्टिंगने हा प्रकार उजेडात आणला. दरम्यान बीएलओंना पाच वाजेपर्यंत केंद्रावरच उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते असे निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार गिरी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.