शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरुग्णांना दैनंदिन औषधे

By admin | Updated: January 26, 2017 04:55 IST

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांना दैनंदिन औषधी पुरवठा करण्याचा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला असून

मुंबई : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांना दैनंदिन औषधी पुरवठा करण्याचा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला असून, सुरुवातीच्या टप्प्यातील पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे. तसेच देशातील ५० जिल्ह्यांत ३० जानेवारीपर्यंत घरोघरी जाऊन क्षयरुग्ण शोधमोहीम हाती घेण्यात आली असून, त्यात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.या दोन्ही उपक्रमांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. केंद्र शासनाने अधिसूचित आजार (नोटिफाएबल डिसीज) म्हणून निर्देशित केलेल्या क्षयरोगाचा रुग्ण आढळल्यास त्याची सूचना संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे तत्काळ देणे सर्व वैद्यकीय व्यावसायिक, वैद्यकीय संस्था आणि संबंधितांना बंधनकारक आहे. मात्र, त्यात टाळाटाळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासन लवकरच कायदा करणार आहे. तसा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असेल. कुपोषण उपचार केंद्रांमध्ये येणाऱ्या प्रत्येक बालकाची तपासणी करताना त्यामध्ये क्षयरोगाची चाचणीही आता आवश्यक करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये आणि सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जीन एक्सपर्ट हे संयंत्र उपलब्ध करून देण्यात येत असून, या संयंत्रामुळे क्षयरोगाचे निदान अचूक आणि जलदगतीने होणार आहे. परिणामी, क्षयरोगाचे निदान होताच तातडीने उपचार सुरू करण्यात येणार असून, उपचारांमधला विलंब आता टळणार आहे. (विशेष प्रतिनिधी)