शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळकरांच्या भूताने परिनिरीक्षण मंडळाला झपाटले

By admin | Updated: July 31, 2014 01:01 IST

दाभोळकरांचे भूत या श्याम पेठकर लिखित नाटकाने चांगलाच गदारोळ केला. हा गदारोळ आणि चर्चा वैचारिक, सामाजिक बाजूने झाला. एका विशिष्ट सदस्याचा या नाटकावर आक्षेप असल्याने बहुमत

नागपूर : दाभोळकरांचे भूत या श्याम पेठकर लिखित नाटकाने चांगलाच गदारोळ केला. हा गदारोळ आणि चर्चा वैचारिक, सामाजिक बाजूने झाला. एका विशिष्ट सदस्याचा या नाटकावर आक्षेप असल्याने बहुमत असल्यावरही नाटकाला रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने परवानगी दिलेली नव्हती. या विषयावर बरेच चर्वितचर्वण झाले. दाभोळकरांचे भूत या नाटकावरच मंडळाची नागपुरातील बैठक गाजली. पण शितल करदेकर या सदस्य मात्र परवानगी न देण्याच्या मुद्यावर ठाम राहिल्या. आता बहुमताच्या आधारावर या नाटकाला परवानगी देण्याचे अध्यक्ष राम जाधव यांनी मान्य केले आहे. पण मंडळाच्या सदस्यांमध्ये वैचारिक गोंधळ आहे आणि कुणीच निश्चित वैचारिक अधिष्ठानावर नसल्याने आपल्याला काहीही शिकायला मिळत नाही, असे कारण देत मुंबईच्या मंडळ सदस्य नम्रता भिंगार्डे यांनी मंडळाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मंडळाच्या सदस्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मंडळावर आपली नियुक्ती करण्यात आली तेव्हा नाट्यक्षेत्रातले दिग्गज लोक या समितीत असतील आणि त्यांच्याकडून काही नवे शिकायला मिळेल, अशी आशा होती. पण मंडळाच्या काही बैठकांना उपस्थित राहिल्यावर मात्र मंडळाच्या बैठका वैचारिक उंचीवर जात नसल्याचे लक्षात आले. त्यामुळेच आपण राजीनामा दिल्याचे मत नम्रता भिंगार्डे यांनी राजीनाम्यात व्यक्त केले आहे. प्रत्यक्षात दाभोळकरांचे भूत या नाटकावरून मंडळ सदस्यांमध्ये होणारी चर्चा योग्य नव्हती. एखाद्या नाटकाबाबत निर्णय घेताना मंडळ सदस्य ठामपणे निर्णय घेत नाहीत. त्यातील चर्चांमध्ये अभ्यासपूर्णता नसते, त्यामुळे भिंगार्डे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आता रंगली आहे.यंदा मंडळावर ज्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली तीच मुळात योग्य नसल्याचीही चर्चा चांगलीच रंगली आहे. शासनाने कुठल्या आधारावर मंडळ सदस्यांची नेमणुक केली, हा प्रश्नही चर्चेला येतो आहे. याच अनुषंगाने सर्वत्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.(प्रतिनिधी)