शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणसेविकांची भरती रखडली

By admin | Updated: May 19, 2016 03:47 IST

१३ आॅगस्ट २०१४ रोजीच्या शासकीय परिपत्रकानुसार अंगणवाडी कर्मचारी भरती प्रक्रिया ही पात्र असलेल्या उमेद्वारातूनच परंतु ती ग्रामसभेतूनच करावी,

भातसानगर : १३ आॅगस्ट २०१४ रोजीच्या शासकीय परिपत्रकानुसार अंगणवाडी कर्मचारी भरती प्रक्रिया ही पात्र असलेल्या उमेद्वारातूनच परंतु ती ग्रामसभेतूनच करावी, असे आदेश असल्याने शहापूर ताल्युक्यातील १८ पदांची भरती रखडली आहे. ग्रामसभांमध्ये होणाऱ्या वादांमुळे ती रखडल्यामुळे ही भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबविण्यात यावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे. आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया करताना १०० पैकी ६० गुण असणाऱ्या अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका, मदतनीस या पदांसाठी निवड सूची तयार करावी त्यातून ग्रामसभा ज्या उमेदवारांच्या नियुक्तीस मान्यता देईल, त्यांची त्या त्या पदांवर नियुक्ती करावी. अशा प्रकरणात गुणवत्ता यादीतील गुणानुक्र म कोणताही असेल तरी त्याचा विचार करण्यात येवू नये. म्हणजे ज्या उमेदवारास अधिक गुण असतील तरीही कमी गुणधारकाची निवड ग्रामसभा करू शकते. त्यामुळे गावागावात वाद होत आहेत. नुकत्याच झालेल्या चिखलगाव, किन्हवली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभामध्ये हे वाद झाले आहेत. शहापूर तालुक्यातील ११ मिनी अंगणवाडीसेविका, ३ अंगणवाडी सेविका,४ मदतनीस अशी १८ पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. मात्र ती आजवर पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)