शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

करोडोच्या ठेवी संकटात

By admin | Updated: May 26, 2014 01:29 IST

समता बँकेच्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीत दोषी आढळलेल्या ११ संचालकांना सहकार मंत्र्यांनी मोकळे सोडल्याने त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार्‍या ४0.८३ कोटी रुपयांच्या वसुलीवर प्रश्नचिन्ह निर्माण

 

समता बँक : मंत्र्यांनी संचालकांना मोकळे सोडले

मोरेश्‍वर मानापुरे - नागपूर

समता बँकेच्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीत दोषी आढळलेल्या ११ संचालकांना सहकार मंत्र्यांनी मोकळे सोडल्याने त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार्‍या ४0.८३ कोटी रुपयांच्या वसुलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उर्वरित चार संचालक आणि तीन अधिकार्‍यांवर सुनावणी सुरू असून पुढे त्यांनाही मोकळे सोडल्यास एकूण १३६.२५ कोटींची रक्कम कुणाकडून वसूल करायची, असा गंभीर प्रश्न अवसायकापुढे उभा ठाकला आहे. सहकार मंत्र्यांच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी कालबद्धता नसल्याने मोकळे सोडलेल्या संचालकांकडून कोट्यवधींच्या वसुलीसाठी खातेदार व ठेवीदार हायकोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.

४0 कोटींच्या वसुलीचे काय?

बी.डी. झळके यांनी ३१ डिसेंबर २0१0 रोजी १५ संचालक व ३ अधिकार्‍यांकडून १३६.२५ कोटींची वसुली निश्‍चित केली होती. सहकार मंत्र्यांनी ११ संचालकांना मोकळे सोडताना त्यांच्याकडील ४0.३६ कोटींचे काय होणार, याबाबत संभ्रम आहे. सुभाष पिंजरकर (५ कोटी), अरविंद बोन्द्रे (४.८३ कोटी), नागवरम श्रीनिवासन (४.८३ कोटी), अरूणा देसाई (३.८८ कोटी), नवमणी तिरपुडे (३.१९ कोटी), सुनील बाळबुधे (२.७१ कोटी), अशोक नारखेडे (४.८३ कोटी), प्रभाकर सर्मथ (२.५३ कोटी), प्रभाकर भिसीकर (२.७१ कोटी), एकनाथ हावरे (मृत) (४.८३ कोटी), गजानन सेलुकर (१ कोटी) अशी मोकळे सोडलेल्या संचालकांची नावे आहेत. तर संचालक दिनकर चिमूरकर (१३.७५ कोटी), मिलिंद चिमूरकर (१५.६0 कोटी), अनंत ब्रrो (४.५७ कोटी), ए.के. कद्रेकर (१.५२ कोटी) तसेच अधिकारी प्रदीप चौधरी (३0.१८ कोटी), केशव कमले (१0.२१ कोटी) व संजय देशपांडे (२0.३६ कोटी) यांच्याकडून एकूण ९५.८९ कोटींच्या वसुलीवर सुनावणी झाली असून सहकार मंत्री लवकरच निर्णय देण्याची शक्यता आहे.

कर्ज ७२ कोटींचे मॉर्गेज ७ कोटी?

बँकेवर अवसायकाची नियुक्ती झाली त्यावेळी संचालकांनी ७ कोटींचे मॉर्गेज ठेवून ७२ कोटींचे कर्ज वाटप केले होते. नवल ग्रुपला १७ कोटी, विजय खेर ६.५0 कोटी, विजय दायमा १३ कोटी, गाडे ग्रुप २ कोटी, अशोक पोटभरे ४.५0 कोटी, दिलीप दाणी १ कोटी, शिवाजी मेश्राम १.५0 कोटी, अभय वैद्य ११.५0 कोटी अशी मोठय़ा कर्जदारांची नावे आहेत. यापैकी विजय दायमा फरार आहेत.

बँकेला ११0 कोटींचे देणे

बँकेला ठेवीदारांना ५८ कोटी रुपये परत करायचे आहेत. याशिवाय महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेला कर्जाचे १७ कोटी आणि डीआयसीजीआय योजनेंतर्गत रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांना वाटप केलेल्या ३८.८३ कोटींपैकी ३५ कोटी असे एकूण ११0 कोटी रुपये बँकेला देणे आहे. रिझर्व्ह बँकेने १९ मार्च २0१0 रोजी बँकेचा परवाना रद्द केला. २२ मार्च २0१0 रोजी अवसायक नियुक्तीचे आदेश आले. ३0 मार्च २0१0 रोजी चैतन्य नासरे, पंकज घोडे व ऑडिटर निनाद उंटवाले या अवसायकाची नियुक्ती झाली. त्यावेळी बँकेत कागदोपत्री ९२ कोटींच्या ठेवी आणि ७२ कोटींचे कर्जवाटप होते.

बँकेने ७२ कोटींचे कर्जवाटप केले खरे, पण त्याबदल्यात त्यांच्याकडे केवळ ७ कोटींचे मॉर्गेज होते तसेच एसएलआर १५ टक्के आणि सीआरआर ३ टक्के गुंतवणुकीचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेने समता बँकेवर ८0 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. असा घोटाळा संचालक व अधिकार्‍यांनी केल्यानंतर त्यांना मोकळे सोडणे हे ठेवीदार व खातेदारांवर आघात करण्यासारखे आहे. याप्रकरणी राज्य सीआयडीच्या चार्जशीटमध्ये ५६ लोकांवर आरोप निश्‍चित केले असून केस कोर्टात आहे.