शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुलं पतीसारखी दिसेनात, DNA चाचणी केली, तरी विश्वास बसेना, पुण्यात महिलेसोबत धक्कादायक प्रकार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 11:44 IST

Pune Crime News: पती-पत्नीमधील नात्यामध्ये संशय निर्माण होऊन त्यामधून संसारात वाद होण्याचे प्रमाण हल्ली खूप वाढले आहे. अशाच संशयामधून नाशिकमधील एका विवाहित महिलेसोबत पुण्यात घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पती-पत्नीमधील नात्यामध्ये संशय निर्माण होऊन त्यामधून संसारात वाद होण्याचे प्रमाण हल्ली खूप वाढले आहे. अशाच संशयामधून नाशिकमधील एका विवाहित महिलेसोबत पुण्यात घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेच्या मुलांचे चेहरे तिच्या पतीसारखे दिसत नाहीत, असा आरोप करत तिच्या सासरच्या मंडळींनी छळ केला. एवढंच नाही तर तिच्या मुलांची डीएनए चाचणीही करवून घेतली. मात्र डीएनए चाचणीत ही मुलं तिच्या पतीचीच असल्याचं निष्पन्न झालं. पण त्यानंतरही त्यांनी तिच्यावर विश्वास न ठेवता तिला मुलांसह घराबाहेर काढलं. या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील पती आणि पत्नी हे सुशिक्षित आहेत. तसेच पती पुण्यामधील एका प्रसिद्ध खाजगी कंपनीमध्ये कामाला आहे. लग्नानंतर हे कुटुंब पुण्यामध्येच स्थायिक झालं होतं. तसेच त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मात्र या जोडप्याच्या मुलांचे चेहरे पतीशी मिळते जुळते नसल्याचा दावा करत सासरच्या मंडळींनी सुनेवर संशय घेण्यास सुरुवात केली.

या प्रकरणातील पीडित महिलेच्या नणंदेने ही मुलं आपल्या भावासारखी दिसत नसल्याचा दावा केला. पुढे सासू-सासऱ्यांनीही सुनेवर आळ घेण्यास सुरुवात केली एवढंच नाही तर एकेदिवशी ही महिला बाहेर गेली असताना सासू सासरे घराला कुलूप लावून गावी निघून गेले. त्यानंतर महिलेने पतीला फोन लावला असता त्यानेही तिच्या मुलं आपल्यासारखी दिसत नसल्याचे सांगून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला.

त्यानंतर या महिलेने स्वत:च्या चारित्र्याची पडताळणी करण्यासाठी डीएनए चाचणी करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर काही कुटुंबीयांच्या उपस्थितीत सदर महिलेची मुले आणि पतीची डीएनए चाचणी करण्यात आली. या डीएनए चाचणीमधून सदर महिलेची मुले ही तिच्या पतीपासूनच झालेली असल्याचे सिद्ध झाले. मात्र चारित्र्याच्या परीक्षेत पास झाल्यानंतरही पतीने आणि सासरच्या मंडळींनी या महिलेला आणि तिच्या मुलांना स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या महिलेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत पती आणि सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांना विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Pune woman faces harassment despite DNA proof of children's paternity.

Web Summary : A Pune woman faced suspicion and harassment from in-laws, who doubted her children's paternity. Despite DNA tests proving her husband as the father, they refused to accept her, leading her to file a police complaint.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrelationshipरिलेशनशिपPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र