शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

स्नॅपडीलविरोधात गुन्हा

By admin | Updated: May 2, 2015 04:43 IST

आॅनलाइन औषधविक्री करणाऱ्या स्नॅपडील.कॉम साइटविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे

मुंबई : आॅनलाइन औषधविक्री करणाऱ्या स्नॅपडील.कॉम साइटविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. अशा साइट्सवर वॉच ठेवण्यासाठी आता एका नव्या सेलची स्थापना करण्यात आल्याचे एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. स्नॅपडीलसोबत फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आणि केमिस्ट आॅनलाइन या साइटची झाडाझडती एफडीएने सुरू केली आहे. स्नॅपडीलविरोधात दाखल झालेल्या तक्रारीतील तथ्यता पडताळण्यासाठी २२ एप्रिलला एफडीएच्या एका कर्मचाऱ्याने आय पिल आणि अनवॉण्टेड ७२ या गर्भनिरोधक गोळ्या मागवून पाहिल्या. मागणीप्रमाणे स्नॅपडीलच्या माध्यमातून या गोळ्या २४ एप्रिलला कर्मचाऱ्याला पोच केल्या. यातून अजूनही औषधांची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. लगेचच एफडीएने विनापरवाना आॅनलाइन औषधे विकणे, आक्षेपार्ह जाहिरात प्रसारित करणे यासाठी औषध आणि सौंदर्यप्रसाधन कायद्यांतर्गत कलम १८ ए, १८ (सी) अन्वये स्नॅपडीलच्या सीईओ आणि संचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. स्नॅपडीलसोबत ही औषधे पुरविणारे व्यापारी आणि कुरिअर कंपनीवरही कारवाई करण्याचे संकेत एफडीएने दिले आहेत.