गारगोटी (जि. कोल्हापूर) : शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढला तरी पाच वर्षे सरकार टिकवण्याची व्यवस्था झालेली आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले.गारगोटी (ता. भुदरगड) येथे भाजपाच्या मेळाव्यात ते बोलत होते. पाटील म्हणाले, कोणी कितीही वल्गना केल्या तरी किंवा शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तरी मी व मुख्यमंत्र्यांनी पर्यायी व्यवस्था केली असल्यामुळे सरकार ५ वर्षे टिकेल. (प्रतिनिधी)
‘सेनेने पाठिंबा काढला तरी पर्यायी व्यवस्था तयार’
By admin | Updated: May 22, 2016 04:23 IST