शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विदेशांतही गोहत्या हे पाप मानतात

By admin | Updated: October 25, 2015 01:33 IST

गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दादरीमधील मुस्लीम व्यक्तीच्या हत्येनंतर राजकारण ढवळून निघाले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

नागपूर : गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दादरीमधील मुस्लीम व्यक्तीच्या हत्येनंतर राजकारण ढवळून निघाले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गोहत्याबंदीचे समर्थन केले आहे. अफ्रिकेतील देशांत हलाखीच्या परिस्थितीत गायीचे रक्त प्राशन करण्यात येते, परंतु त्या बदल्यात तिचे पोषण करण्यात येते. गाईला मारणे तेथेही पाप समजले जाते, अशा शब्दांत त्यांनी गोहत्याबंदीवर भाष्य केले. नागपुरातील आर. एस. धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘आयसीसीएस’च्या (इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज्) संयुक्त विद्यमाने ‘प्राचीन भारतीय संस्कृतीचे जगातील प्रतिध्वनी’ या विषयावर शनिवारपासून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य अतिथी म्हणून डॉ. भागवत बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा हे उपस्थित होते. भारताला पुरातन संस्कृती लाभली आहे. भारताच्या संस्कृतीत वैश्विक दृष्टी आहे अन् जगाला आज तिची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. स्वातंत्र्यानंतर देशातील संस्कृतीचा प्रसार होणे अपेक्षित होते. परंतु व्यक्तिवाद व कुटुंबवादावर जास्त भर देण्यात आल्याने संस्कृतीचे पोषण झालेच नाही. अगदी देशातील स्वातंत्र्यसंग्रामात लढणाऱ्या व्यक्तींवर ‘नेहरू मेमोरिअल’च्या माध्यमातून प्रकाश टाकला तरी भगवीकरणाचा आरोप होतो. संस्कृतीची व्याख्या आपल्या देशात करणे कठीणच आहे, असे महेश शर्मा म्हणाले. (प्रतिनिधी)भागवतांचे ‘गरुडा’स्त्रदेशात प्राचीन संस्कृतीचे प्रतीक असलेली नावे देण्यावर विवाद होतो त्याबद्दल डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी भाष्य केले. इंडोनेशियामध्ये आघाडीची विमानकंपनी ‘गरुडा-इंडोनेशिया’ हिला पुराणांमधील गरुडाचे स्थान लक्षात घेऊन नाव देण्यात आले आहे. परंतु आपल्या देशात अशी नावे देण्याचा प्रयत्न झाला तर मात्र गोंधळाला सुरुवात होते, असे ते म्हणाले. त्यांचा रोख केंद्रातील विरोधी पक्ष व डाव्या विचारसरणीच्या पक्षांवर होता. डॉ. महेश शर्मा यांनीदेखील सरसंघचालकांचीच री ओढत असे प्रयत्न झाले तर भगवीकरणाचे आरोप होतात असे वक्तव्य केले. परंतु जर नवीन प्रकल्पांना अशी भारतीय संस्कृतीशी जुळलेली नावे देण्याचा प्रस्ताव आला तर त्यांचा सकारात्मकपणे विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.