शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचा हमीभाव उत्पादन खर्चाएवढाही नाही

By admin | Updated: February 6, 2015 02:22 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत सोहळय़ात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शेतक-यांची व्यथा.

विवेक चांदूरकर / अकोला:सर्व राज्यांमधील कापूस पिकाचा उत्पादन खर्च आणि उत्पादकता लक्षात घेऊन केंद्र सरकार हमी भाव जाहीर करते. राज्यात कापूस हे प्रमुख पीक असले, तरी या पिकाचे उत्पादन कमी आहे. दुसरीकडे उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमी भावात शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनीच गुरूवारी अकोला येथे दिली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दीक्षांत समारोहाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील शेती व्यवसायातील समस्या व त्यावरील उपाययोजनांवर विचार व्यक्त केले. मुख्यमंत्री म्हणाले, कापूस हे राज्यातील प्रमुख पीक आहे. कापसाचे हमी भाव केंद्र सरकार घोषित करते. हे भाव घोषित करताना केंद्र सरकार देशातील सर्व राज्यांमधील कापसाचे उत्पादन व त्यासाठी येणारा खर्च याची माहिती घेऊन शेतकर्‍यांना परवडेल असे हमी भाव जाहीर करते. यावर्षी कापसाला केंद्र सरकारने ४0५0 रुपये हमी भाव जाहीर केला. राज्यात कापसाचे एकरी उत्पादन अन्य राज्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे शासन जाहीर करीत असलेले हमी भाव शेतकर्‍यांना परवडत नाहीत, तसेच या हमी भावात शेतकर्‍यांना दोन पैसेही उरत नाहीत. राज्यात बीटी बियाण्यांमुळे कापसाचे उत्पादन वाढले खरे, मात्र उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे उत्पादन वाढविणार्‍या बियाण्यांवर आणखी संशोधन करण्याची गरज आहे. विद्यापीठाने ते काम करायला हवे. शेतकर्‍यांनीही उत्पादन वाढविण्यावर भर द्यायला हवा. नवनवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन खर्च कमी करण्याची गरज असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. विद्यापीठाने केलेले संशोधन केवळ कागदावर असून, ते शेतात जाणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यात समन्वय वाढविण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.