शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

वरोऱ्यात बनावट नोटा चलनात

By admin | Updated: March 4, 2017 00:35 IST

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून वरोरा शहरात शंभर रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याची माहिती आहे.

पोलीस अनभिज्ञ : नागरिक व व्यावसायिकांत भीती
वरोरा : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून वरोरा शहरात शंभर रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याची माहिती आहे. यामुळे नागरिक व व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीही या शहरात बनावट नोटा चलनात आल्या होत्या, हे विशेष.
५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर शासनाने दोन हजार व ५०० च्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. नवीन दोन हजार व ५०० च्याही नोटा चलनातून बाद होण्याची अनामिक भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे शंभर, पन्नास, वीस व दहा रुपयांच्या नोटांना नागरिक साठवून ठेवत असल्याचे दिसून येत आहे.
याचा फायदा घेत शंभर रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या जात आहेत. गर्दीच्या ठिकाणी अशा नोटा व्यावसायिकांना दिल्या जात असल्याची नागरिकात चर्चा आहे.
घाई असल्याने नागरिक लगबगीने या नोटा आपल्या पॉकीटात टाकतात, त्या बनावट आहेत की नाही याची शहानिशा केली जात नाही. त्यामुळे नागरिकांची फसगत होत आहे. अनेकांना अशा बनावट नोटा मिळाल्या आहेत.
मात्र पोलिसात तक्रार केल्यास पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल, या भीतीने कुणीही अद्याप पोलिसात तक्रार करण्यास धजावला नाही. (तालुका प्रतिनिधी)

बनावट नोटा बँकेत जात नाही
बनावट नोटा तयार करणारे बँकेकडे फिरकत नाहीत. बँकेतील यंत्राद्वारे त्वरित बनावट नोट ओळखून आपण पकडले जाऊ, या भीतीने ते या बनावट नोटा बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी चालविल्या जात आहे.
स्कॅनरचा उपयोग
शंभरच्या नोटा अगदी सुक्ष्मपणे व बारकाईने बघितल्यास या नोटा स्कॅनरचा उपयोग करून तयार करण्यात आल्या असाव्या, असे जाणवते. या प्रकरणात परप्रांतीय टोळी सक्रिय असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.