शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

‘भ्रष्ट’ अभियंत्यांची अटक अटळ

By admin | Updated: October 2, 2015 00:16 IST

धरणगाव तालुक्यातील वाघलूड आणि सोनवड खुर्द या दोन गावांमधील पाणीपुरवठा योजनांची कामे करताना ४२ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेले

मुंबई : धरणगाव तालुक्यातील वाघलूड आणि सोनवड खुर्द या दोन गावांमधील पाणीपुरवठा योजनांची कामे करताना ४२ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेले जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता चंद्रकांत परशराम वाघ आणि शाखा अभियंता सुधीर देविदास डहाके या दोघांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयानेही गुरुवारी कायम केला. परिणामी अटक टाळण्यासाठी या दोघांनी गेली दोन वर्षे चालविलेले प्रयत्न संपले असून, त्यांची अटक आता अटळ आहे.धरणगाव पोलिसांनी नोंदविलेल्या दोन गुन्ह्यांमध्ये हे दोन्ही अभियंते आरोपी असून जळगावचे तत्कालीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. सुराणा यांनी त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. मात्र, मूळ फिर्यादी रमेश माणिक पाटील यांनी केलेल्या याचिका मंजूर करून उच्च न्यायालयाचे औरंगाबाद येथील न्यायाधीश न्या. टी. व्ही. नलावडे यांनी २९ जानेवारी रोजी या दोघांचे अटकपूर्व जामीन रद्द केले होते. एवढेच नव्हे, तर या दोघांनी सत्र न्यायालयाची फसवणूक करून लबाडीने जामीन मिळविला, असे स्पष्ट मत नोंदवत या दोघांना तत्काळ अटक करण्याचे आदेशही न्या. नलावडे यांनी दिले होते.मात्र, वाघ व डहाके यांनी याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात केलेली अपिले गेले आठ महिने प्रलंबित राहिल्याने दोघांचीही अटक टळली होती. मात्र, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. दीपक मिश्रा व न्या. प्रफुल्ल चंद्र पंत यांच्या खंडपीठाने त्यांची अपिले फेटाळली. आश्चर्य म्हणजे या दोघांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी सरकारने कोणताही पुढाकार घेतला नव्हता. मात्र, उच्च व सर्वोच्च न्यायालयात सरकारी वकिलांनी अटकपूर्व जामीन रद्द करण्याचे जोरदार समर्थन केले. शिवाय, या दोघांना कोठडीत घेऊन तपास करणे गरजेचे आहे; परंतु अटकपूर्व जामिनामुळे तपास दोन वर्षे रखडला आहे, याकडेही आवर्जून लक्ष वेधले.सुरुवातीला जळगावचे तत्कालीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. ए. दीक्षित यांनी अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर उच्च न्यायालयात याचिका करून या दोघांनी अनेक क्लृप्त्या करून सुमारे वर्षभर कसा वेळ काढला व याचिका फेटाळण्यात येत असल्याचे समोर आले होते.