शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद धोक्यात? विधान परिषद निवडणूक लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 06:23 IST

ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आपल्याला सहा महिन्यांच्या आत विधीमंडळाचे सदस्य होणे बंधनकारक असेल, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे यांना त्याचवेळी लेखी दिले होते. त्यामुळे ठाकरे यांना येत्या २७ मे पर्यंत आमदार होणे आवश्यक असेल.

मुंबई : विधानसभा सदस्याद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी होणारी निवडणूक कोरोना संकटामुळे अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदभार्तील आदेश जारी केले आहेत. याच ९ पैकी एका जागेवर मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे निवडून जातील असे मानले जात होते; मात्र आता ही निवडणूकच पुढे ढकलल्याने ठाकरे यांच्यासमोर काहीसा पेच निर्माण होऊ शकतो. मात्र त्यातून निश्चितच मार्ग निघेल. कारण दोन-तीन पर्याय खुले आहेत, अडचण येणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आपल्याला सहा महिन्यांच्या आत विधीमंडळाचे सदस्य होणे बंधनकारक असेल, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे यांना त्याचवेळी लेखी दिले होते. त्यामुळे ठाकरे यांना येत्या २७ मे पर्यंत आमदार होणे आवश्यक असेल.विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे सदस्य हेमंत टकले, आनंद ठाकूर,किरण पावसकर, काँग्रेसचे हरिभाऊ राठोड, शिवसनेच्या नीलम गो-हे, भाजपचे अरूण अडसड, पृथ्वीराज देशमुख, स्मिता वाघ आणि पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले व आता शिवसेनेत असलेले चंद्रकांत रघुवंशी या सदस्यांची मुदत येत्या २४ एप्रिल रोजी संपत आहे. यापैकी रघुवंशी यांनी राजीनामा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांसमोर तीन पर्यायमाजी विधान मंडळ सचिव अनंत कळसे यांच्या मते मुख्यमंत्र्यांसमोर तीन पर्याय असू शकतील.१. विधान परिषदेची ९ जागांची निवडणूक २७ मे रोजी होऊन त्यात ते निवडून येऊ शकतात.२. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत राज्यपाल नियुक्त एखादे विधान परिषद सदस्य राजीनामा देतील आणि त्या जागी उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ शकतात. नंतर विधान परिषदेच्या नियमित द्वेवार्षिक निवडणुकीत ठाकरे निवडून येऊ शकतात.३, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी म्हणजे त्यांना विधिमंडळ सदस्य होण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा अवधी मिळू शकेल.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस