CoronaVirus: राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 02:24 PM2021-05-18T14:24:54+5:302021-05-18T14:26:22+5:30

CoronaVirus: लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे.

coronavirus shiv sena aditya thackeray statement on increase limit of lockdown in maharashtra | CoronaVirus: राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

CoronaVirus: राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Next
ठळक मुद्देराज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार?आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलंअधिकाधिक लसीकरणावर भर - आदित्य ठाकरे

मुंबई: देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी आहे. राज्यातील ठाकरे सरकारने १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे. (coronavirus shiv sena aditya thackeray statement on increase limit of lockdown in maharashtra) 

ठाकरे सरकारने १ जूनपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत. आदित्य ठाकरे यांनी सीएनबीसी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान राज्यातील लॉकडाऊनसंदर्भात भूमिका स्पष्ट केली. लॉकडाऊन असला तरी, राज्यात महत्वाची कार्यालये, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरू आहे. पण तुम्ही अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर कधी पडणार, असे विचारत असाल तर ते पूर्पणे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

चिंतेत भर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांनी गमावला जीव; बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू

कोरोना रुग्णांच्या संख्येवर हे सर्व अवलंबून

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येवर हे सर्व अवलंबून आहे. राज्यात चाचण्यांची संख्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रत्येकाने चाचणी करावी, यासाठीही पुढाकार घेत असून, कोरोना रुग्णसंख्या किती आहे, यावरच लॉकडाऊन उठवला जावा की वाढवला जावा, ही बाब अवलंबून असणार आहे. आरोग्य आणि सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

“मोदी ‘सिस्टिम’ला झोपेतून जागे करणे गरजेचे”: राहुल गांधींचे टीकास्त्र

अधिकाधिक लसीकरणावर भर

राज्य सरकारकडून अधिकाधिक लसीकरणावर भर दिला जात आहे. महाराष्ट्रात सर्वांत जलदगतीने लसीकरण होत आहे. आम्ही आतापर्यंत दोन कोटी नागरिकांचे लसीकरण केले आहे. जागतिक स्तरावरही प्रयत्न सुरू आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येऊ शकणाऱ्या तिसऱ्या लाटेला रोखायचं असेल तर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करुन त्यांना सुरक्षित करावे लागेल. ग्रामीण भागात जास्त लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी लसीसकरण करण्याचे आव्हान राज्य सरकारसमोर आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

“देशात कोणाच्याही जीवाची किंमत राहिलेली नाही”; रवीश कुमारांचे PM मोदींवर टीकास्त्र

दरम्यान, देशात गेल्या २४ तासात २,६३,५३३ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ४,२२,४३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४,३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या भारतात ३३,५३,७६५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच १८ कोटी ४४ लाख ५३ हजार १४९ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 
 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus shiv sena aditya thackeray statement on increase limit of lockdown in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app