शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

CoronaVirus News: गोपुरीच्या सेंद्रीय मास्कला इंग्लंडमध्ये मागणी; एक हजार मास्कची ऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 3:45 AM

मास्क निर्मितीमुळे मिळत आहे स्थानिकांच्या हाताला काम

वर्धा : कोरोनामुळे मास्कला मागणी वाढल्याने विविध संस्था, कंपन्या मास्क निर्मितीत उतरल्या आहेत. आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केलेल्या गोपुरीच्या ग्राम सेवा मंडळाने एक पाऊल पुढे टाकत देशी (सेंद्रिय) कापसापासून मास्क तयार केले असून हे मास्क सातासमुद्रापार पोहोचले आहेत.ग्राम सेवा मंडळाने अस्सल सेंद्रिय कापसाच्या कापडापासून मास्क बनवायला सुरुवात केली. खादीमध्ये कार्यरत इंग्लंडमधील मित्रांना सुरुवातीला मास्कचे नमुने पाठविण्यात आले. तेथे त्यांनी ते विक्रीला ठेवले. इंग्लंडमध्ये हे सेंद्रिय मास्क ग्राहकांच्या पसंतीला उतरले आणि हळूहळू मागणी वाढू लागली. इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले आणि ग्रामसेवा मंडळाशी जुळलेले किशोर शहा व त्यांच्या मित्र परिवाराने या मास्कमध्ये विशेष रुची दाखविली. मास्कच्या आता चांगल्या आॅर्डर तेथे मिळत आहे. स्वातंत्र्यलढ्यात खादीने बंडाचा झेंडा रोवला. आता कोरोनापासून संरक्षण आणि हाताला काम, अशी दुहेरी भूमिका पार पाडणाऱ्या खादीने मास्कच्या रूपात कोरोनाच्या लढ्यातही योगदान दिले आहे.सुमारे महिनाभर काम केल्यावर इंग्लंड येथे मास्क पाठविण्यात आले आहेत. हे मास्क पसंतीला उतरत असून ग्रामसेवा मंडळाला एक हजार मास्कची आॅर्डर मिळाली आहे. हे मास्क श्वसनाला चांगले असून घाम आला तरी त्रास होत नाही. धुवून वापरता येतात.- करुणा फुटाणे, अध्यक्ष,क़जग्रामसेवा मंडळ, गोपुरी, वर्धा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या