CoronaVirus News: Maharashtra reports 6,159 new COVID-19 cases, 4,844 recoveries, and 65 deaths | CoronaVirus News : चिंताजनक! राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

CoronaVirus News : चिंताजनक! राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

ठळक मुद्देसध्या राज्यात ५ लाख २९ हजार ३४४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार ९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आता पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे. आज राज्यात ६ हजार १५९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १७ लाख ९५ हजार ९५९ इतकी झाली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ६५ मृत्यूंची नोंद झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

आज राज्यात ६ हजार १५९ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज ४ हजार ८४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आता एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १६ लाख ६३ हजार ७२३ इतकी झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२. ६४ टक्के इतके झाले आहे. तर आज राज्यात एकूण ६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २. ६० टक्के इतका आहे.


सध्या राज्यात ५ लाख २९ हजार ३४४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार ९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८४ हजार ४६४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४ लाख ५६ हजार ९६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ९५ हजार ९५९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: Maharashtra reports 6,159 new COVID-19 cases, 4,844 recoveries, and 65 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.