CoronaVirus News: कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरला माजी आमदार पुत्राकडून मारहाण; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 11:19 PM2021-05-12T23:19:40+5:302021-05-12T23:27:06+5:30

CoronaVirus News: डॉ. मारबते यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला येऊन दाखल केली तक्रार

CoronaVirus News Former congress MLA lawrence gedam son beats doctor in covid hospital | CoronaVirus News: कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरला माजी आमदार पुत्राकडून मारहाण; व्हिडीओ व्हायरल

CoronaVirus News: कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरला माजी आमदार पुत्राकडून मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Next

आरमोरी (गडचिरोली) : जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते तथा आरमोरीचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लाॅरेन्स गेडाम याने येथील सरकारी कोविड रुग्णालयातील डॉ.अभिजित मारबते यांना मारहाण केली. गृहविलगीकरणात असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासाठी गोळ्या देण्यावरून ही बाचाबाची झाली आणि नंतर मारहाण झाली. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

धक्कादायक! रुग्णवाहिका आली, कर्मचारी उतरले अन् कोरोना बाधितांचे मृतदेह नदीत फेकले

प्राप्त माहितीनुसार, येथील बर्डी भागात असलेल्या कोविड केअर सेंटरवर बुधवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास लॉरेन्स गेडाम आपल्या गृहविलगीकरणात असलेल्या नातेवाईकाची औषधे (गोळ्या) घेण्यासाठी गेले होते. तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी गोळ्या दिल्या, पण यावेळी अतिरिक्त गोळ्या देण्यावरून कर्मचारी आणि नोडल अधिकारी डॉ. अभिजित मारबते यांच्याशी बाचाबाची झाली. यावेळी लॉरेन्सने शिवीगाळ करत डॉ.मारबते यांना मारहाण केली.



“त्या गंभीर चुकांमुळे भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झाली भयावह परिस्थिती”

या प्रकारानंतर डॉ. मारबते यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली. रात्री १० वाजेपर्यंत यासंदर्भात जबाब घेणे सुरुच होते. दरम्यान माजी आमदारपुत्र लॉरेन्स पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

Web Title: CoronaVirus News Former congress MLA lawrence gedam son beats doctor in covid hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.