शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

CoronaVirus News : राज्यातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये डबल म्युटंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 6:36 AM

CoronaVirus News: पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेने तपासलेल्या कोरोनाच्या ३६१ नमुन्यांमध्ये डबल म्युटेशन झाल्याचे दिसून आले. मात्र, महाराष्ट्रातील दररोजच्या चाचण्यांचा विचार करता तपासलेल्या नमुन्यांचे हे प्रमाण अतिशय कमी आहे.

मुंबई : राज्यात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत तपासण्यात आलेल्या ३६१ नमुन्यांपैकी ६१ टक्के नमुन्यांमध्ये डबल म्युटेशन झाल्याचे निदर्शनास आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. मात्र, एवढ्या कमी प्रमाणातील नमुन्यांवरून म्युटेशन झालेल्या विषाणूचा फैलाव राज्यात झाल्याचे म्हटले जाऊ शकत नाही, असेही तज्ज्ञांचे मत आहे. हे ३६१ नमुने राज्यातील जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळांमध्ये तपासले आहेत.पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेने तपासलेल्या कोरोनाच्या ३६१ नमुन्यांमध्ये डबल म्युटेशन झाल्याचे दिसून आले. मात्र, महाराष्ट्रातील दररोजच्या चाचण्यांचा विचार करता तपासलेल्या नमुन्यांचे हे प्रमाण अतिशय कमी आहे. महाराष्ट्रात दिवसाला सरासरी दोन लाख चाचण्या केल्या जातात. त्यामुळे इतक्या कमी नमुन्यांवरून राज्यात म्युटेशन झालेल्या विषाणूचा प्रसार झाला असे म्हटले जाऊ शकत नाही, अशी माहिती नॅशनल सेंटर फोर डिसीज कंट्रोलचे संचालक डॉ. सुजित सिंग यांनी दिली.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांनी राज्यातील, तसेच केंद्रीय जनुकीय क्रमनिर्धारण प्रयोगशाळांच्या नमुना विश्लेषणाबाबतच्या निष्कर्षांच्या संदर्भात संवादाचा अभाव असल्याची तक्रार आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केली. यामुळे स्थानिक संस्था आणि राज्य आरोग्य अधिकारी अंधारात राहात असून, कोरोना नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

म्युटेशन म्हणजे कायम्युटेशन ही अशी क्रिया आहे, ज्यात संबंधित विषाणू त्याच्याविरोधात केल्या जाणाऱ्या उपायांना दाद न देण्याच्या दृष्टीने स्वतःमध्ये काही जनुकीय बदल घडवून आणतो. म्युटेशन होण्यापूर्वीच्या विषाणूसाठी तयार केलेल्या लसीचा किंवा औषधांचा परिणाम म्युटेशन झालेल्या विषाणूवर होईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे असे म्युटेशन्स शोधण्याचे काम सुरू असते. लस विकसित करून ती देण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे साहजिकच कोरोनाकडूनही स्वतःच्या बचावासाठी म्युटेशन्स सुरू आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र